शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन गरजेचा

By admin | Updated: March 9, 2016 00:59 IST

संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

कुलसचिव : विद्यापीठात संशोधन पेपर लिखाणावर कार्यशाळाअमरावती : संशोधन पेपर लिहिणे, ही एक कला असून त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दर्जेदार पध्दतीने संशोधन पेपर लिहिण्यासाठी आयोजित कार्यशाळा ही सुवर्णसंधी ठरली आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले.रसायनशास्त्र विभाग व नॅशनल अ‍ॅकेडेमी आॅफ सायन्सेस इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, निसाचे यू.सी. श्रीवास्तव, के.सत्यनारायणा, निरजकुमार, पी.सी. अभिलाष, रसायनशास्त्र विभाग प्रमुख आनंद अस्वार उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय देशमुख म्हणाले, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे संशोधन पेपर लिहिण्यासाठी सैद्धांतिक विचारांसोबत भाषेची मांडणी उत्तमरितीने करता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ही कला अवगत करणे अपेक्षित असून उत्कृष्टपणे लिहिण्यासाठी उत्कृष्ट श्रोता असणेसुध्दा महत्त्वाचे आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे ते उत्कृष्ट संशोधन पेपर लिहितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीवास्तव म्हणाले की, कार्यशाळेत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यातून अचुकता येऊन संशोधन पेपर लिहिण्याच्या परिपूर्णतेकडे विद्यार्थी जातील आणि त्यांची उत्कृष्ट लेखनकृती प्रकाशमय होऊन सर्वांपर्यंत पोहोचेल. अध्यक्षीय भाषण माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी केले. ते म्हणाले, राईटिंग व फाईटिंग दोेन्ही गोष्टी अवघड असतात. लिखाणासाठी वैचारिक शक्ती महत्त्वाची आहे. अनेकांना पेपर लिहिण्याची सैद्धांतिक पध्दतीची माहिती असतेच असे नाही, त्यानुषंगाने कार्यशाळा महत्वाचा टप्पा ठरली आहे. यावेळी दिग्रसचे प्राचार्य आगरकर व सोनल बूब या सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत आपल्या मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक विभाग प्रमुख आनंद अस्वार तर संचालन व आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले. कार्यशाळेला देशभरातून २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेत इतरही अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.