शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू, एसटी बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

अद्यापही मेळघाटसह अन्य तालुक्यांतील ६२७ बस बंद अमरावती : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात ...

अद्यापही मेळघाटसह अन्य तालुक्यांतील ६२७ बस बंद

अमरावती : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या. पण, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यातील आठ आगारांतून किमान २ हजार ४९३ बस धावत होत्या. सद्यस्थितीत १ हजार ८६६ बसफेऱ्या सुरू आहेत, तर अद्यापही ६२७ बसफेऱ्या बंद आहेत. या बसच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांकडे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था आहे, तेच पाल्य शाळेत उपस्थित राहत आहेत. पण, ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही, त्यांचे मात्र नुकसान होत आहे. धारणी, चिखलदरा, चांदूर रेल्वे व इतर काही तालुक्यांमधील अनेक बसफेऱ्या विद्यार्थी पास काढल्या गेल्या नसल्याने व प्रवाशांकडून प्रतिसाद कमी असल्याने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

कोरोनाआधी किती बस धावत होत्या?

जिल्ह्यात कोरोना संसर्गाआधी एकूण २४९३ बस धावत होत्या. कोरोनानंतर १८६६ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मानव विकास मिशनच्या जिल्ह्यात धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत ११ बस आहेत. या बस सोडल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा नाही.

बॉक्स

या मार्गावर नाही एकही फेरी

लॉकडाऊनपूर्वी २४९३ बस सुरू होत्या. सध्या १८३३ फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये आठ आगारांचा समावेश आहे. मात्र, चांदूर रेल्वे तालुक्यासह परतवाडा व अन्य आगारांतून विविध मार्गांवर सोडल्या जाणाऱ्या ६२७ फेऱ्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

कोट

शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी बस बंद असल्याने गैरसोईचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने बस बंद असल्याचे सांगितले जाते.

- चेतन हरसुले, विद्यार्थी, सलोना

कोट

आम्हाला शाळेमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत. ज्यांच्याकडे वाहनांची सुविधा आहे, ती मुले पालकांच्या मदतीने मी शाळेत जाऊ शकतात. परंतु, गरीब मुलांचे मात्र त्यामुळे बसेस सुरू करणे गरजेचे आहे.

- चंचल खडके, विद्यार्थिनी, मोथा

बॉक्स

जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या

२४९६

विद्यार्थी संख्या

पाचवी ते आठवी १७७८२१

नववी ते बारावी १५५५१८

कोट

शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाने बसफेऱ्या वाढविल्या आहेत. मागणीनुसार आणखी गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी पासचा वापर केलेला नाही. ही संख्या वाढणे गरजेचे आहे

- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ