शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शाळा शुल्क 'कॅशलेस'

By admin | Updated: December 26, 2016 00:37 IST

नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या पालकांना आता पाल्याचे शैक्षणिक शुल्कदेखील ‘कॅशलेस’ भरावे लागणार आहे.

नोटाबंदीचा परिणाम : शालेय शिक्षण विभागाचे पाऊल अमरावती : नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या पालकांना आता पाल्याचे शैक्षणिक शुल्कदेखील ‘कॅशलेस’ भरावे लागणार आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने पावले उचलली आहे. येत्या सत्रापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे शुल्क हे आता रोखीऐवजी धनादेश, आरटीजीएस, डेबिट, क्रेडिट कार्ड आदींद्वारे स्वीकारले जाणार आहे. शाळा व्यवस्थापनाला तशी तयारी करावी लागणार असल्याचे संकेत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये विविध शुल्क हे विद्यार्थ्यांपासून येत्या शैक्षणिक सत्रापांसून ‘कॅशलेस’ स्वीकारले जाणार आहे. हल्ली नोटाबंदीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दोन सत्रातील शैक्षणिक शुल्क हे पालकांना अदा करावे लागत आहे. पैसे मिळविण्यासाठी पालकांना बॅकेत रांगा लावाव्या लागत आहे. मात्र येत्या सत्रापांसून शैक्षणिक शुल्क हे कॅशलेस भरावे लागणार आहे. राष्ट्रीयीतकृत बँकांसोबत करार करून शालेय शिक्षण विभाग स्वतंत्र 'अ‍ॅप' आणण्याच्या तयारीत आहे. जेणकरून अ‍ॅपद्वारे पालकांना शुल्क भरता येणार आहे. शाळांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याच्या दिशेने शिक्षण विभागाने वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात २८०० शाळा असून शालेय शिक्षण विभागाने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला कळविले आहे. (प्रतिनिधी)