शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख गॅसधारकांची बँक खाती नाहीत

By admin | Updated: November 12, 2014 22:36 IST

गॅस सिलिंडरची सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात ही पूर्वीची योजना नव्या सरकारने सुरू करण्याचा निर्णय नव्याने घेतला आहे. आधारकार्ड नसेल; पण बँक खाते जोडल्यास या योजनेचा लाभ आता गॅस सिलिंडरधारकांना

जितेंद्र दखणे - अमरावतीगॅस सिलिंडरची सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात ही पूर्वीची योजना नव्या सरकारने सुरू करण्याचा निर्णय नव्याने घेतला आहे. आधारकार्ड नसेल; पण बँक खाते जोडल्यास या योजनेचा लाभ आता गॅस सिलिंडरधारकांना घेता येणार आहे. मात्र सामान्यांसाठी ही प्रक्रिया किचकट असल्याने डोकेदुखी ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. एवढंही करून ही योजना निरंतर सुरू राहील काय, असा सवाल उपस्थित होत आहे.थेट खात्यात गॅस सिलिंडरची सबसिडी जमा करण्याची योजना मागील शासनकाळात अवलंबविण्यात आली होती. दरम्यान काही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया पार पाडताना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच एवढी रक्कम एकदम भरणे सामान्यांना कठीण जात असल्याने भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे देशभरात ही बंद करण्याची धडपड करण्यात आली. दरम्यान भाजपने या योजनेला विरोध दर्शविला होता. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा थेट बँक खात्यात सबसिडी योजना (मॉडीफाय डीबीटीएल) सुरू करण्याच्या हालचाली नव्या सरकारने सुरू केल्याने सामान्य ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या योजनेमुळे शासनाचा व ग्राहकांचा फायदा असेल तर मध्यंतरी बंद का करण्यात आली, असा सवाल सामान्य ग्राहकांनी उपस्थित केला आहे.केंद्र शासनाने गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यासाठी २ सष्टेंबर २०१३ रोजी सुरू केलेली यूपीए सरकारच्या कार्यकाळातील डायरेक्ट बेनिफिट टॉन्सफर योजनेतील काही नियमांत बदल करून केंद्रातील भाजपाच्या सरकारने ही योजना नावात बदल करून मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना पुन्हा सुरू केली आहे. मात्र या योजनेबाबत गॅस ग्राहकांमध्ये संभ्रम कायम असल्याने ही योजनाही डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता वाढली आहे.जिल्ह्यात केंद्र शासनाने १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना लागू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एलपीजी गॅस अनुदान १०० टक्के बँक खात्यात जमा केले जाईल. जिल्ह्यात ४,०५,१७७ गॅस धारकांपैकी २,७६०९५ गॅस धारकाचे क्रमांक हे बँक खात्याशी जोडण्यात आले आहेत. मात्र उर्वरित १,२९,०८२ गॅसधारक अद्यापही बँक खात्याशी जोडलेले नाहीत. त्यामुळे या अशा गॅसधारकांना नव्याने सुरू होणारी ही योजना नेमकी कशी आहे. याबाबत जिल्ह्यातील १,२९,०८२ गॅसधारक संभ्रमावस्था आहेत. या ग्राहकांना आपल्या बॅक खात्याची नोंद संबंधित गॅ्रस वितरकाकडे करणे आवश्यक आहे.