वरूडच्या महेंद्री जंगलाला अभयारण्याची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:36+5:30

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१ आणि २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत.

Sanction for sanctuary to Mahendra forest of Warud | वरूडच्या महेंद्री जंगलाला अभयारण्याची मंजुरी

वरूडच्या महेंद्री जंगलाला अभयारण्याची मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्सिंग : मुख्यमंत्र्यांचे वनविभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या नागपूर येथे बैठकीत या अभयारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले. यामुळे वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर पडली असून, जंगल टुरिझमला चालना मिळणार आहे.
सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१ आणि २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. अनेक प्रकारची वृक्षे आहेत. १०८ वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृहसुद्धा आहे. यामुळे अनेक वर्षांपासून महेंद्री-पंढरी परिसर अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींकडून केली जात होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र वन्यजीव मंडळासोबत व्हिसीद्वारे बैठक घेऊन महेंद्री जंगलाला अभयारण्य करण्यास मंजुरात दिली. तसा प्रस्ताव वनविभागाने तातडीने सादर करावा असे आदेश दिले. यावेळी पक्षिप्रेमी किशोर रिठे, वन्यजीव अभ्यासक यादव तरटे उपस्थित होते.

अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केली. वरूड तालुक्यातील जंगलात पशू-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. विस्तीर्ण असे जंगल आहे. अभयारण्यामुळे देश-विदेशातील अभ्यासक येथे येऊन संशोधन करतील. वरूड तालुक्याचे महत्त्व वाढेल.
प्रशांत लांबाडे, वनाधिकारी

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला. महेंद्री अभयारण्याला मान्यता देण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांनी वनविभातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी

महेंद्री वनक्षेत्रात अभयारण्याला मंजुरी मिळाल्याने पक्षिमित्रांना अभ्यासाची संधी मिळेल. या परिसरात विदेशी पक्ष्यांचा आॅगस्ट ते डिसेंबर दरम्यान वावर असतो. परिसराचे नाव जगाच्या नकाशावर येईल.
आशिष चौधरी, पक्षीमित्र, वरूड
 

Web Title: Sanction for sanctuary to Mahendra forest of Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल