अंतर्गत ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:52+5:302021-02-05T05:32:52+5:30

बेनोडा (शहीद):- वरूड व मोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांतील रस्ते व महामार्गाचे पोचरस्ते अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने ग्रामिणांचे हाल ...

Sakade for repair of internal rural roads | अंतर्गत ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी साकडे

अंतर्गत ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी साकडे

बेनोडा (शहीद):- वरूड व मोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांतील रस्ते व महामार्गाचे पोचरस्ते अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने ग्रामिणांचे हाल होतात. ते दुरुस्त करून दिलासा देण्याकडे पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी लक्ष घालावे, या मागणीचे निवेदन विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेच्यावतीने पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर आणि आमदार देवेंद्र भुयार यांना देण्यात आले.

हिवरखेड ते सालबर्डी, जामगाव ते खडका, बेनोडा ते माणिकपूर, बेनोडा ते धामणदस, नशीदपूर ते येवती हे रस्ते खस्ता हाल असून, यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होऊन नागरिकांना दुखापत होते. याशिवाय दोन्ही तालुक्यांतील बऱ्याच डांबरी रस्त्यांना अनेक वर्षांपासून तडे गेले असून, त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यावरून वाहतूक करताना ग्रामिणांची दमछाक होते. याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे आणि सचिव प्रमोद राऊत याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Sakade for repair of internal rural roads