आरटीई ७९७ प्रवेश रद्द १६५९ मुलांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:34+5:30

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

RTE 797 Admission canceled 1659 children got admission | आरटीई ७९७ प्रवेश रद्द १६५९ मुलांना मिळाला प्रवेश

आरटीई ७९७ प्रवेश रद्द १६५९ मुलांना मिळाला प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : नऊ हजार तीन विद्यार्थ्यांचे अर्ज

जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. निवड यादीतील २८ जणांच्या तपासणीपैकी २२ पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. याशिवाय प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, त्यातील ३० पाल्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. शिक्षण विभागामार्फत आरटीई अंतर्गत आथिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिलीत एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. मार्च महिन्यात पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील २३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात केल्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या मुदतीत सोडतीतील २३५० पैकी १६५९ बालकांचेच प्रवेश झाले. काहींचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही. त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, यामध्ये अद्याप एकही प्रवेश झालेला नाही.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकाकडून शिक्षण विभागाकडे ३० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ तक्रारींचा निपटारा झाला. उर्वरित २८ तक्रारींची पडताळणी करून २२ पाल्यांचे प्रवेश रद्द झाले. प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, यात दोषी ३० पाल्यांचे प्रवेश रद्दची कारवाई सीईओंच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

२४५६ पैकी १६५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया २३ ऑक्टोबरपर्यंत राबविली जाईल. सीईओंच्या आदेशानुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून अपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत.
- ई.झेड खान, शिक्षणाधिकारी

Web Title: RTE 797 Admission canceled 1659 children got admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.