शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१५ केळी उत्पादकांना ४३ लाखांची भरपाई

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

मर रोगाने हानी झालेल्या जिल्ह्यातील १५ केळी उत्पादकांना रोपे विकणाऱ्या कंपनीने ४३ लाख १९ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

अमरावती : मर रोगाने हानी झालेल्या जिल्ह्यातील १५ केळी उत्पादकांना रोपे विकणाऱ्या कंपनीने ४३ लाख १९ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. सन २०१३ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ‘कोरे बायोटेक’ कंपनी द्वारा उतीसंवर्धन केळीची रोपे शेतकऱ्यांनी विकत घेतली होती. कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली. मात्र, काही दिवसांत ‘मर’ रोगाने ४० टक्क्यावर रोपे सुकली. तरीही कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व कागदपत्रांची शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. उतीसंवर्धक केळीची रोपे सुकत असताना कंपनीद्वारे शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले नाही. परिणामी फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दिलीप लाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. कृषी अनुसंधान केंद्राचे कृषी विषयतज्ज्ञ पी.एच.महल्ले, के.पी.सिंग, व्ही. डी.खवली, महाबीजचे अधिकारी सलामे, कृषी अधिकारी रावंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असता केळीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. समितीच्या अहवालानुसार कोरे बायोटेक बनाना टिश्यूकल्चर लॅब अ‍ॅन्ड नर्सरी, जि. सोलापूर यांचे उतीसंवर्धन केळी रोपे वापरलेल्या शेतात २८ ते ७७ टक्क्यापर्यंत मर आढळून आली. कंपनीने निकृष्ट दर्जाची रोपे दिल्याचे अहवालात स्पष्ट केले. ग्राहक पंचायतीद्वारा रवींद्र मराठे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार केली. कंपनीद्वारा एन.बी.कलंत्री यांनी बाजू मांडली. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी ४३ लाख १९ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. (प्रतिनिधी)