शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे अधिकार गोठविले

By admin | Updated: June 18, 2014 23:51 IST

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची मंगळवारी नाट्यमरीत्या वर्णी लागली. या नियुक्तीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे. गटनेतेपदाचे अधिकार गोठविताना

उच्च न्यायालयाचा स्थगनादेश : पुढील आदेशापर्यंत कामकाजावर प्रतिबंध
अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची मंगळवारी नाट्यमरीत्या वर्णी लागली. या नियुक्तीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे. गटनेतेपदाचे अधिकार गोठविताना पुढील आदेशांपर्यंत कोणीही हे अधिकार वापरू नयेत, असे विशेष आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस फ्रन्टच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर यांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती; मात्र, २३ सदस्य संख्या असलेला महापालिकेतील राष्ट्रवादी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन गटात विभागला गेला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत ७ तर संजय खोडके यांच्या नेतृत्वाला मान्यता देणारे १६ सदस्य राष्ट्रवादी फ्रन्टसोबत गेले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासूनच महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर की सुनील काळे हा वाद कायम होता. या वादावर विभागीय आयुक्तांनी विशेष आदेश काढून महापालिकेला एका पत्राद्वारे काळे यांची गटनेतेपदी नोंद करून घेण्यास सांगितले. यानुसार मंगळवारच्या आमसभेत पीठासीन सभापती नंदकिशोर वऱ्हाडे यांनी काळे यांच्या नावाची गटनेतेपदी घोषणा केली. मात्र, ही घोषणा नियमबाह्य असल्याचा आरोप करीत अविनाश मार्डीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. २३ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून मार्डीकर यांना गटनेता म्हणून मान्य केल्याची बाब उच्च न्यायालयापुढे मांडली. त्यामुळे काळे यांच्या नावाची घोषणा नियमबाह्य असल्याची बाब याचिकेद्वारे न्यायमूर्ती धर्माधिकारी,न्या. भडांगे यांच्या न्यायालयात सादर केली. अविनाश मार्डीकर यांच्या बाजूने किशोर शेळके, भांगडे यांनी युक्तिवाद केला. तर सुनील काळे यांच्या बाजूने गोरटे यांनी युक्तिवाद केला. गटनेतेपदाचे अधिकार गोठविताना कोणीही या पदाचे अधिकार वापरणार नाही, हे विशेष आदेश देण्यात आले. या याचिकेवर पुढील सुनावणीसाठी २५ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय आणि महापालिका आमसभेत झालेल्या गटनेतेपदाच्या घोषणेबाबतची माहिती न्यायालयाने मागविल्याची माहिती आहे.