१५०० रुपयांची लाच घेताना महसूल सहायक जाळ्यात ! तिवसा तहसीलमध्ये एसीबीचा ‘ट्रॅप’

By प्रदीप भाकरे | Updated: May 11, 2026 20:28 IST2026-05-11T20:26:42+5:302026-05-11T20:28:00+5:30

Amravati : कामात वारंवार तारखा देऊन अडवणूक करणे आणि ते काम मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या एका महसूल कर्मचाऱ्याला १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Revenue Assistant caught taking bribe of Rs. 1500! ACB's 'trap' in Tivasa Tehsil | १५०० रुपयांची लाच घेताना महसूल सहायक जाळ्यात ! तिवसा तहसीलमध्ये एसीबीचा ‘ट्रॅप’

Revenue Assistant caught taking bribe of Rs. 1500! ACB's 'trap' in Tivasa Tehsil

अमरावती : कामात वारंवार तारखा देऊन अडवणूक करणे आणि ते काम मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या एका महसूल कर्मचाऱ्याला १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राहुल शंकरराव निस्वादे (वय ४३ वर्ष) असे लाचखोराचे नाव असून, तो तिवसा तहसील कार्यालयात महसूल सहायक आहे. ११ मे रोजी दुपारी १२.४५ ते १.३० वाजेदरम्यान तिवसा तहसील कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराविरुद्ध तिवसा तहसील कार्यालयात प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण सुरू होते. हे प्रकरण वारंवार तारखा न देता लवकर निकाली काढण्यासाठी राहुल निस्वादे याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी अमरावती एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने ८ मे रोजी पडताळणी केली, मात्र त्या दिवशी भेट होऊ शकली नाही. अखेर, ११ मे रोजी दुसऱ्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती १५०० रुपये घेण्याचे ठरले. तिवसा तहसील कार्यालय परिसरातच सापळा रचण्यात आला होता. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने निस्वादेला ताब्यात घेतले.

Web Title : तिवसा में राजस्व सहायक 1500 रुपये की रिश्वत लेते रंगे हाथों गिरफ्तार!

Web Summary : तिवसा में एक राजस्व सहायक को एसीबी ने 1500 रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया। राहुल निस्वादे ने एक लंबित मामले को जल्द निपटाने के लिए पैसे की मांग की थी। शिकायत दर्ज होने के बाद एसीबी ने जाल बिछाकर निस्वादे को तहसील कार्यालय में रंगे हाथों पकड़ लिया।

Web Title : Revenue Assistant Caught Red-Handed Accepting Bribe of ₹1500 in Tivasa!

Web Summary : A revenue assistant in Tivasa was arrested by ACB for accepting a ₹1500 bribe. Rahul Niswade demanded money to expedite a pending case. ACB laid a trap after a complaint was filed, catching Niswade red-handed at the tehsil office.