शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर एक्स्प्रेसमध्ये हरविलेली बॅग दिली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांकावर १ वर आली होती. गाडीतून प्रवासी बाहेर पडल्यानंतर रेल्वे पोलीस नियमितपणे रिकाम्या डब्यांची पाहणी करतात. दरम्यान कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगारी आणि जमादार मदन वानखडे यांना एका डब्यात काऴ्या रंगाची बॅग दिसून आली.

ठळक मुद्देपोलिसांचे कर्तव्य : प्रवाशाला मिळाला लॅपटॉप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर आली असताना पोलिसांच्या तपासणीअंती एका डब्यात काळ्या रंगाची बॅग आढळली. ही बॅग नेमकी कुणाची, ही चौकशी करून त्यानंतर रेल्वेपोलिसांनी शोध घेतला आणि ती बॅग प्रवाशाला सुखरूप परत केली. शुभम शामकांत औगड (रा. पोटे टाऊनशिप, अमरावती) असे त्या प्रवाशाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांकावर १ वर आली होती. गाडीतून प्रवासी बाहेर पडल्यानंतर रेल्वे पोलीस नियमितपणे रिकाम्या डब्यांची पाहणी करतात. दरम्यान कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगारी आणि जमादार मदन वानखडे यांना एका डब्यात काऴ्या रंगाची बॅग दिसून आली. ही बॅग ताब्यात घेऊन पंचनामा केला असता यात नामांकित कंपनीचे लॅपटॉप व अन्य साहित्य आढळून आले. कालांतराने शुभम औगड हे वडिलांसोबत रेल्वे पोलीस चौकीत आले असता जबलपूर एक्स्प्रेसमध्ये बॅग हरविल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी खातरजमा करून ही बॅग परत केली. लॅपटॉपसह बॅग परत मिळाल्याचा आनंद औगड यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. रेल्वे पोलिसांनी दर्शविलेल्या सौजन्याने त्यांनी आभारदेखील मानले.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस