शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

पाच प्रसूतींची जबाबदारी एकाच परिचारिकेवर

By admin | Updated: May 22, 2014 00:41 IST

जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना प्रसूती संदर्भात आरोग्य सेवा

जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना प्रसूती संदर्भात आरोग्य सेवा पुरविणार्‍या जिल्हा स्त्री रुग्णालयात पाच महिलांच्या प्रसूतीची जबाबदारी एकाच परिचारिकेवर आहे. त्यामुळे येथील परिचारिकांसह कर्मचार्‍यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. डफरीनमध्ये केवळ ५६ परिचारिका कार्यरत असल्याने प्रसूत महिलांना देण्यात येणारी आरोग्य सेवा खोळंबली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हा स्त्री रूग्णालयात जिल्हाभरातून अनेक महिला प्रसूतीकरिता येतात. मात्र, महिला रूग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड वारंवार होत असते. परंतु रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने अपुर्‍या मनुष्यबळाअभावी रूग्णांना सेवा देण्यात रूग्णालय प्रशासन कमी पडत आहे. उन्हाळ्यात प्रसूतीकरिता येणार्‍या महिलांचा ओघ रूग्णालयात वाढला आहे. रुग्णालयातील ६ वॉर्डांमध्ये ३५0 हून अधिक महिला उपचारासाठी दाखल आहेत.

सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) पाच रुग्णांमागे एकच परिचारिका असल्याचे दिसते. नियमानुसार एका रुग्णाकरिता तीन परिचारिकांची आवश्यकता असते. परिचारिकांच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे. तरीदेखील तोकड्या मनुष्यबळावर जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कारभार सुरु आहे. मनुष्यबळ वाढविण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासनाला कळविण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन वॉर्डांची निर्मिती करण्याची गरज आहे.