शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक करातून वसतिगृहांची सुटका

By admin | Updated: September 10, 2016 00:25 IST

राज्यातील सरकारी वसतिगृहे व्यावसायिक हेतूने चालविली जात नाही.

निर्णय : राज्य सरकारचे पाऊलअमरावती : राज्यातील सरकारी वसतिगृहे व्यावसायिक हेतूने चालविली जात नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी वसतिगृहांना व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाने व्यावसायिक दरातील करातून आता वसतिगृहांची सुटका झाली आहे. वसतिगृहांना जास्तीच्या करातून सूट मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३९४ सरकारी वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी २९६ वसतिगृहे सरकारी जागेत, तर १७६ वसतिगृहे भाड्याच्या जागेत चालविली जातात. वसतिगृहांची योजना सरकारकडून राबविली जात असून वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही मोफत दिले जाते. या योजनेत व्यावसायिक हेतू नसला तरीही महापालिका, नगरपालिकांकडून वसतिगृहांना व्यावसायिक दराने मालमत्ता कर लावला जात होता. व्यावसायिक कर अधिक असल्याने वसतिगृहांना हा कर भरणे शक्य होत नव्हते. सरकारी कामासाठीदेखील व्यावसायिक कर वसूल केला जात असल्याने या पद्धतीत बदल करण्यासाठी नियोजन केले जात होते. या पद्धतीत आता बदल करण्यात आला असून येथून पुढे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घरगुती कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तांचाच दर वस्तीगृहांच्या मालमत्ता करास लावावा, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. मालमत्ता करातील ही सूट सामाजिक न्याय विभागाच्या स्वमालकीच्या व भाड्याने घेतलेल्या इमारतींनाच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)