शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या प्रकल्पाचा अहवाल देणार

By admin | Updated: February 24, 2016 00:20 IST

लोकोपयोगी प्रकल्पांना लालफितशाहीत अडकविण्याचे धोरण अवलंबविणाऱ्या यंत्रणेचा अहवाल मुख्यमंत्री,

पत्रपरिषद : विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचा निर्णयअमरावती : लोकोपयोगी प्रकल्पांना लालफितशाहीत अडकविण्याचे धोरण अवलंबविणाऱ्या यंत्रणेचा अहवाल मुख्यमंत्री, मुख्य प्रधान सचिवांना सादर करणार, अशी माहिती विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख आ. सुनील देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.उपक्रम समितीने सोमवार, मंगळवार असे दोन दिवस बडनेरा, चिखलदरा व अमरावती येथील रखडलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. बेलोरा विमानतळाचे सिडकोकडून विकास केला जाणार आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे दोन वर्षांपूर्वी ३९ कोटी रुपये प्रलंबित होते. मात्र सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक होताच ही रक्कम वळती करण्यात आली आहे. विमानतळाची धावपट्टी १८०० मीटर वाढविली जाणार आहे. लवकरच विमान सेवा सुरू केली जाईल. चिखलदरा हे हील स्टेशन असताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने चिखलदऱ्याचे मार्केटिंग केले नाही. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली नाही. हे पर्यटन विकास महामंडळ नव्हे, तर विध्वंस विकास महामंडळ असल्याचा आरोप आ. सुनील देशमुख यांनी केला. येथील एमआयडीसीत भेट दिली असता काही उद्योग मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण विकास महामंडळाने अस्वच्छ पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रकल्प तयार करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढीस लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पर्यटनाला चालना देण्यासाठी आग्रही असताना पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी नकारात्मक भूमिका घेत आहेत. दोन दिवसाच्या भेटीत आलेला अनुभव अहवाल स्वरुपात शासनाकडे सादर केला जाईल असे समितीने ठरविल्याचे आमदार देशमुख म्हणाले. यावेळी आ.यशोमती ठाकूर, आ. अनिल परब, आ. बळीराम डोळस आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)