शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा परतला आनंदीचा आनंद!

By admin | Updated: November 16, 2014 22:42 IST

घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले.

सुटकेचा श्वास : नाकपुडीत अडकला होता मणीअमरावती : घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले. पित्याने लगेच तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून तो खडा नाकातून बाहेर काढला आणि चिमुरडीच्या पित्यासह बघ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. आनंदी प्रवीण बोरकर (३, रा. मासोद) असे चिमुकलीचे नाव आहे. शहरालगतच्या छोट्या गावात राहणारी आनंदी नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. शेजारचे सवंगडीही तिच्यासोबत खेळत होते. खेळता-खेळता आनंदीला छोट्या दगडाच्या आकाराचा एक चमकदार मणी सापडला. हिऱ्याप्रमाणे चमकदार मण्याशी खेळण्यात आनंदी रममाण झाली. काही वेळाने तिने तो मणी नाकाच्या कोपऱ्यावर लावून धरला. नाकातील चमकीप्रमाणे चमकणारा तो मणी पाहून तिच्या मैत्रिणी देखिल आनंदीत झाल्या. मात्र, क्षणात तो मणी नाकपुडीत ओढला गेला. आनंदीला श्वास घेणे अवघड झाले. त्यामुळे तो मणी नाकातून काढण्याचे प्रयत्न आनंदीने सुरु केले. मात्र नाकात मणी निघत नसल्यामुळे तिचा जीव कासाविस होऊ लागला. आनंदीने जोरजोरात रडणे सुरू केले. वडिलांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांच्या लक्षात घटेनेचे गांभीर्य आले. त्यांनी स्वत:च खडा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडा नाकपुडीच्या आत सरकू लागला. त्यांनी तत्काळ आनंदीला दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर पाटील यांनी लगेच खडा नाकाबाहेर काढला. डायमंड नाकातून बाहेर काढताच आनंदीच्या वडीलांनी सुटकेचा श्वास सोडला. रूग्णालयात बघ्यांची गर्दी जमली होती. नाकातून खडा बाहेर काढताच आनंदीच्या चेहऱ्यावर अचानक हास्य फुलले.