शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

पंधराव्या वित्त आयोगातून थकीत देयकांची उधारी चुकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज देयकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने ...

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज देयकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने ग्रामीण भाग अंधारात गेला आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतीची वसुली होत नसल्याने पंधराव्या वित्त आयोगातून ही रक्कम भरण्यास ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडील वीज देयकांची रक्कम चुकती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या पथदिव्यांचे लाखो रुपयांची वीज देयके थकीत आहेत. ही देयके वसूल होत नसल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा माेहीम हाती घेतली होती. यात अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित झाला. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वसुलीमुळे थांबविण्यात आल्याने महावितरणला अडचणी निर्माण झाल्या. ग्रामपंचायतींना बिले भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरणने कडक पावले उचलत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा मार्ग अवलंबिला होता. त्यामुळे गावोगावी चौकाचौकांत अंधार पसरला होता. कोरोनाकाळात ग्रामपंचायतीची वसुली होत नसल्याने ग्रामपंचायत महावितरणचे पैसे भरण्यास नकार देत आहे. वीज जोडणी तोडल्यास कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणा चालवण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना दिलासा देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून थकीत बिल भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.

कोट

कोरोनाकाळात ग्रामपंचायतीच्या करवसुलीला ब्रेक लागला होता. अशा परिस्थिती पथदिव्यांची वीज भरणे शक्य नव्हते. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची थकीत बिले भरण्यास परवानगी दिली आहे.

- दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)