शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार

By admin | Updated: December 14, 2015 00:11 IST

तालुक्यातील कुरळपूर्णा मौजातील शेतकऱ्यांचा शेतातून विहीरीवरुन तसेच बांधकाम सुरू असलेल्या घरावरून हेतुपुरस्पर विद्युत मुख्य वाहीनी टाकल्याने वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार समोर आला आहे.

शेतकऱ्याची तक्रार : बांधकाम सुरू असलेल्या घरावरून गेली विद्युत जोडणीसुमित हरकुट चांदूरबाजारतालुक्यातील कुरळपूर्णा मौजातील शेतकऱ्यांचा शेतातून विहीरीवरुन तसेच बांधकाम सुरू असलेल्या घरावरून हेतुपुरस्पर विद्युत मुख्य वाहीनी टाकल्याने वीज वितरण कंपनीचा अफलातून कारभार समोर आला आहे. विद्युत वितरण कंपनीतर्फे तालुक्यात शेतशिवीरात विद्युत खांब उभारुन विद्युत जोडणी देण्याचे कामे झपाट्याने सुरू आहे. या सर्व कामाकरिता कंपनीतर्फे कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या कामावर कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने या कामात मोठे गैरप्रकार होत असल्याचा अनेक तक्रारी आहे. असाच एक प्रकार तालुक्यातील मौजा कुरळपूर्णा येथे घडला. या शेतशिवारात सर्वे नंबर २८६ हे प्रवीण मनोहरराव मोहोड यांचे शेत आहे. यांचा शेतात एक विहीर असून शेतात एका घराचे बांधकाम सुरू आहे. तसेच यांचा नजीकच्या शेतात विद्युत जोडणी सुरू असल्याने प्रवीण मोहोड यांचा शेतातून विद्युत जोडणीचे वाहीन्या गेलेल्या आहे. मात्र संबंधित कंत्राटदारतर्फे बांधकाम सुरू असलेल्या घरावरून तसेच विहीरीवरून विद्युत वाहीन्या न टाकणे असा नियम असून सुद्धा हेतुपुरस्पर कंत्राटदारामार्फत सदर बांधकामावरून तसेच विहीरीवरून विद्युत जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवीण मोहोड यांचा शेतातील चुकीच्या विद्युत जोडणीमुळे शेतात काम करण्याचा जिवाला धोका निर्माण झाला आहे.या सर्व प्रकाराविषयी प्रवीण मोहोड यांनी विद्युत खांब टाकतानाच आक्षेप घेतला होता. मात्र तरीही कंत्राटदारामार्फत हेतुपुरस्पर घरावरुनच विद्युत वाहीन्या टाकण्यात आल्याने अखेर प्रवीण मोहोड यांनी या प्रकरणाची तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. या प्रकरणात कंत्राटदारातर्फे नियमबाह्य विद्युत जोडणी केली असून ती तत्काळ बदलविण्याची मागणी प्रवीण मोहोड तर्फे करण्यात आली आहे. असे अनेक प्रकारे नियमबाह्य विद्युत जोडण्या केल्याने आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांना जिव गमवावा लागला आहे. असे असून सुद्धा ही विद्युत वितरण कंपनीची कुंभकर्णी झोप उघडत नसल्याने विद्युत वितरण कंपनीही कंत्राटदारांचा हातातील कठपुतली बनलेले चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. प्रवीण मोहोड यांच्या तक्रारीनुसार त्यांचा शेतातील विद्युत जोडणी ही चुकीची करण्यात आली आहे.