तीन तालुक्यांतील नऊ गावांना रेड कार्ड

By Admin | Updated: June 14, 2014 23:02 IST2014-06-14T23:02:14+5:302014-06-14T23:02:14+5:30

पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील नऊ गावांना रेड कार्ड देण्यात आली आहेत. या गावातील दूषित जलस्त्रोतांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने वरील नऊ

Red Cards to nine villages in three talukas | तीन तालुक्यांतील नऊ गावांना रेड कार्ड

तीन तालुक्यांतील नऊ गावांना रेड कार्ड

पावसाळापूर्व नियोजन : खबरदारीसाठी उपाययोजना सुरू
अमरावती : पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील नऊ गावांना रेड कार्ड देण्यात आली आहेत. या गावातील दूषित जलस्त्रोतांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने वरील नऊ गावांच्या ग्रामपंचायतींना सूचना देऊन स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
धारणी तालुक्यातील चटवाबोड, बैरागड आणि चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा, मोथाखेडा, अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा भगत, शिराळा व देवरा या नऊ गावांत कुठल्याही वेळी रेड कार्ड दिले जाऊ शकते. पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावतात. त्याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामपंचायतींकडून विशिष्ट प्रश्नावली भरून घेतले जाते. त्याआधी संबंधित ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित असल्याचा निष्कर्ष काढला जातो व त्या गावात रेड कार्ड दिले जाते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी त्रुटी पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला जातो. त्यानुसार या नऊ गावांनासुध्दा अल्टिमेटम दिला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.जे. पराडकर तसेच चऱ्हाटे यांनी सांगितले. रेड कार्ड दिल्यानंतर या गावांची जलस्त्रोेत सुधारणांची जबाबदारी वाढली आहे.

Web Title: Red Cards to nine villages in three talukas