ज्येष्ठांसाठी ३० हजार लस प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST2021-03-04T04:24:15+5:302021-03-04T04:24:15+5:30

अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले असून, गुरुवारपासून खासगी रुग्णालयांनाही लस वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार ज्येष्ठ ...

Received 30,000 vaccines for seniors | ज्येष्ठांसाठी ३० हजार लस प्राप्त

ज्येष्ठांसाठी ३० हजार लस प्राप्त

अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले असून, गुरुवारपासून खासगी रुग्णालयांनाही लस वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना तेथील केंद्रांवरही लस घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

जिल्ह्यातील आठ खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यात नव्याने २० हजार कोविशिल्ड, तर १० हजार कोव्हॅक्सिन लस प्राप्त झाली आहे. त्यातील काही लस खासगी रूग्णालयातील लसीकरण केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येईल. लस साठवणुकीची सोय, लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ याआधारे लसीकरण केंद्राची परवानगी दिली जाते. त्यानुसार टप्‍प्‍याटप्प्याने या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होत आहे.

सध्या ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (कॉमर्बिडिटी) असणारे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होत आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य उपलब्ध आहे. परवानगीप्राप्त खासगी लसीकरण केंद्रांवर प्रतिलाभार्थी अडीचशे रुपये शुल्क आकारण्यात येईल. लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एक हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. रणमले यांनी दिली.

Web Title: Received 30,000 vaccines for seniors