मोर्शी येथे महिला स्वयंसहाय्य बचत गटाचे रेडीमेड गारमेंट युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:22+5:302021-02-05T05:31:22+5:30

श्रीकृष्ण पेठ येथे मंगळवारी या युनिटचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले. व्यासपीठावर आ. देवेंद्र ...

Readymade Garment Unit of Women's Self Help Group at Morshi | मोर्शी येथे महिला स्वयंसहाय्य बचत गटाचे रेडीमेड गारमेंट युनिट

मोर्शी येथे महिला स्वयंसहाय्य बचत गटाचे रेडीमेड गारमेंट युनिट

श्रीकृष्ण पेठ येथे मंगळवारी या युनिटचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले. व्यासपीठावर आ. देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष मेघना मडघे, विभागीय नियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, झेप सीएमआरसी अध्यक्ष भारती सूर्यवंशी, माहेर सीएमआरसी अध्यक्ष कौशल्य इथे, झेप सीएमआरसी व्यवस्थापक शारदा सातंगे, बँक व्यवस्थापक राजेश ठाकरे, जितेंद्र केदार, अमित शिंदे, सचिन निर्मळ, नगरसेविका प्रतिभा महल्ले, छाया ढोले, क्रांती चौधरी, वैशाली कोकाटे, सुनीता कोहळे, विद्या ढवळे , पंचायत समिती उपसभापती माया वानखडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादने तसेच कापडी पिशव्या मांडण्यात आल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला. महामंडळाच्या कर्मचारी मीनाक्षी शेंडे, राम साहू, ऋषीकेश घ्यार, मेघा केंडे, संकेत तायवाडे यांच्यासह महिला बचतगट सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे व संचालन अर्चना खांडेकर यांनी केले.

Web Title: Readymade Garment Unit of Women's Self Help Group at Morshi