शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

राणा लँडमार्ककडून फसवणूक - ३३६ गुतंवणूकदारांच्या तक्रारी

By admin | Updated: October 8, 2014 22:57 IST

दोन वर्षे हप्त्याचा भरणा केल्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक करणारे राणा लँडमार्कचे संचालक योगेश राणाविरुध्द आतापर्यंत ३३६ गुतवणूकदारांनी

अमरावती : दोन वर्षे हप्त्याचा भरणा केल्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक करणारे राणा लँडमार्कचे संचालक योगेश राणाविरुध्द आतापर्यंत ३३६ गुतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.राणा लँडमार्कचा मुख्य सूत्रधार योगेश राणा याला २५ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान योगेश राणा याने शहरातील ९६२ नागरिकांकडून गुंतवणुकीच्या नावावर पैसे घेतल्याची कबुली दिली होती. यामध्ये ३३६ गुतवणूकदारांकडून राणा याने ५ कोटी ४१ लाख २३ हजार रुपये उकळले. परंतु त्यांना फ्लॅट उपलब्ध करुन दिले नाहीत. शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल तक्रारीवरून योगेश राणाला अटक करण्यात आली होती. आरोपीला अटक केल्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने योगेश राणा याचे सहा बँकांमधील खाते गोठविले. ज्यामध्ये ५२ हजार ८६६ रुपये आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी १ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला होता. योगेश राणाला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा आरोपी योगेश राणाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आणखी एक दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.