शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी धरणे

By admin | Updated: November 3, 2014 23:18 IST

राजापेठ येथील बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीच्या समस्येविषयी योग्य तो तोडगा निघावा तसेच वस्तुस्थिती नागरिकांना कळावी, यासाठी सोमवारी राजापेठ रेल्वे उड्डाण पूल

अमरावती : राजापेठ येथील बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीच्या समस्येविषयी योग्य तो तोडगा निघावा तसेच वस्तुस्थिती नागरिकांना कळावी, यासाठी सोमवारी राजापेठ रेल्वे उड्डाण पूल कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राजापेठ भागातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.कृती समितीचे मुन्ना राठोड, नितीन मोहोड, नगरसेवक दिनेश बुब, सुनील राणा यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाण पूल निर्मिती ही काळाची गरज आहे. त्याकरिता यापूर्वी अनेक आंदोलन झालेत. परिणामी राज्य शासन, रेल्वे प्रशासनाला राजापेठ येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल निर्माण करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र या पुलाच्या निर्मितीसाठी यापूर्वी अनेकदा भूमिपूजनाचे सोहळे पार पडले. परंतु उड्डाण पुलाच्या निर्मितीचा अद्यापही मुहूर्त सापडला नाही, असा आरोप मुन्ना राठोड यांनी केला आहे. या पुलाच्या निर्मितीचे श्रेय आमदार, खासदारांनी घेतले. मात्र हा पूल कधी निर्माण होणार? या पुलाच्या निर्मितीसाठी लागणारा निधी कोठून आणणार याची उकल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केली नाही. त्यामुळे कृती समितीचे धरणे आंदोलन रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत याप्रकरणी काय केले, हे नागरिकांना कळावे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे मुन्ना राठोड यांनी सांगितले. दरम्यान रेल्वेचे अधिकारी विजयसिंह किल्लेदार, पी.डी. खडसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या व्यथा जाणून घेतल्या.