जुगारावर धाड; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:45+5:302020-12-12T04:30:45+5:30

फोटो पी ११ नांदगाव नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : तालुक्यातील धानोरा गुरव ते एकपाळा शिवारातील जुगारावर धाड घालून तब्बल २६ ...

Raids on gambling; 26 lakh confiscated | जुगारावर धाड; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगारावर धाड; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

फोटो पी ११ नांदगाव

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : तालुक्यातील धानोरा गुरव ते एकपाळा शिवारातील जुगारावर धाड घालून तब्बल २६ लाख ६० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी ही कारवाई केली. घटनास्थळाहून ११ आरोपींना अटक करण्यात आली.

शिवारात १० ते १५ जण जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून ही धाड टाकण्यात आली. घटनास्थळाहून १ लाख ६७ हजार रुपये रोख, ३३ हजार ५०० रुपये किमतीचे सहा मोबाईल, ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी व २० लाख रुपये किमतीची चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. आरोपी हे धानोरा, शेलू नटवा, साईनगर (अमरावती), कोहळा, जुनी वस्ती बडनेरा, शिरपूर, सावंगा बु., नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव बारी व लालखेड येथील रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे तपन कोल्हे, नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार उंबरकर, सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे, उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

------------

Web Title: Raids on gambling; 26 lakh confiscated