खोलापुरी गेट येथे अवैध दारूविक्रीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:26+5:302020-12-31T04:14:26+5:30

देशपांडे प्लॉट येथे देशी दारू जप्त अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे प्ल़ॉट येथील अक्षय सहदेव निखार (२४) ...

Raid on illegal sale of liquor at Kholapuri Gate | खोलापुरी गेट येथे अवैध दारूविक्रीवर धाड

खोलापुरी गेट येथे अवैध दारूविक्रीवर धाड

देशपांडे प्लॉट येथे देशी दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे प्ल़ॉट येथील अक्षय सहदेव निखार (२४) याच्याकडून देशी दारूच्या ३८ बॉटल जप्त करण्यात आल्या. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई २९ डिसेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

---------

कुंड खुर्द येथे अवैध दारूविक्री

वलगाव : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंड खुर्द येथे विजय रूपराव घुगरे (४५) तसेच तात्याराव रामदास जवंजाळ (५५) व एका ५० वर्षीय महिलेविरुद्ध अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. २९ डिसेंबर रोजी ही कारवाई वलगाव पोलिसांनी केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

------------

तडीपार आरोपीकडून आदेशाचे उल्लंघन

दर्यापूर : भातकुली तालुक्यातील सायत येथील उमेश ऊर्फ पिंट्या भगवान वर्धे (२८) याला १ डिसेंबरपासून दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तो २९ डिसेंबर रोजी स्वत:च्या घरी आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भातकुली पोलिसांनी कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Raid on illegal sale of liquor at Kholapuri Gate