शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसमवेतच्या 'सेल्फी'वर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 10, 2017 00:32 IST

शाळेच्या हजेरी पटावरील बोगसपण रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेली 'सेल्फी वुईथ स्टुंडन्ट' योजनेला प्रारंभ होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

अंमलबजावणी : योजना सुरू करण्याचे वरिष्ठांचे आदेशअमरावती : शाळेच्या हजेरी पटावरील बोगसपण रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेली 'सेल्फी वुईथ स्टुंडन्ट' योजनेला प्रारंभ होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारपासून १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व वर्गात ही योजना सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी सरल प्रणालीतून करावयाची आहे. त्याबाबत कोणत्याही मागदर्शक सूचना न आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आधार क्रमांक लिंक करावयाचा असताना त्याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध होत नसल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील नोव्हेंबरमध्ये राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून ती शासनाच्या वेबसाईटवर 'अपलोड' करावा, असे आदेश काढले होते. शिक्षणमंत्र्यांच्या या उपक्रमावर चोहोबाजूंनी टीका झाली तरीदेखील शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय रेटला आहे. सोमवारपासून हा उपक्रम सुरू करण्याचे आदेश देण्आच आले आहेत. पण या योजनेच्या अंमलबजावणीच्या आणि वापरासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या ज्या सरल वेबसाईटवर हे फोटो अपलोड करावयाचे आहेत, त्या प्रणालीमध्येच मुळात नेटवर्कचे दोष आहेत. याचे निराकरण झालेले नाही. या उपक्रमाच्या ट्रायल करताना फोटो अपलोड करताना चक्क एक दिवस गेल्याचा अनुभव शिक्षकांना आला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचे कनेक्शनच्या सिग्नलच्या अडचणीसह सर्वात मोठी अडचण आधार कार्डाच्या जोडणीच्यासंदभार्तील तयार झाली आहे. १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व मुलांचे आधार कार्ड या सरल प्रणालीला आधी जोडावे लागणार आहेत. याची जोडणी झाल्यानंतरच संबंधिताचे फोटो काढल्यानंतर ते या लिकंशी जोडले जाणार आहेत. आधार नंबर नसेल तर ही जोडणी करणे शक्य होणार नाही. १ ली ते १२ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक असतील असे नाही. तसेच या मधल्या काळात हे क्रमांक जोडण्याचा वेग पाहता अजून काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून अजून सूचना आलेल्या नसल्याचे स्पष्ट केले. याला म.रा.प्राथमिक शिक्षक समितीने १९ नोहेंबला मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केला होता. शिक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सेल्फी घेण्याबाबतचा अट्टाहास का? शाळांना संगणक व इतर सोई उपलब्ध नाहीत, त्या प्रथम द्याव्यात, अशी मागणीसुध्दा शिक्षक समितीने केली आहे. (प्रतिनिधी)