शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिधावस्तू व केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर

By admin | Updated: September 27, 2015 00:17 IST

जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांसाठी माहे आॅक्टोबरच्या वितरणाकरिता रास्त भाव ...

तातडीचे निर्देश : २१ सप्टेेंबरपासून अंमलबजावणी सुरूअमरावती : जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांसाठी माहे आॅक्टोबरच्या वितरणाकरिता रास्त भाव दुकानदारांना २१ सप्टेंबरपासून धान्यपुरवठा सुरू झाला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्ह्यातील कार्यरत शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अंत्योदय कार्ड संख्येनुसार धारकांसाठी प्रतिशिधापत्रिका १० किलो, गहू १५ किलो, तांदूळ १० किलो, ज्वारी उपलब्धतेनुसार तसेच ५ किलो मका वितरित करण्यात येतील. गव्हाचा प्रतिकिलो दर २ रुपये असून तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये या दराने वितरित करण्यात येईल. प्राधान्य कुुटुंब गटातील लोकसंख्येनुसार शिधापत्रिकाधारकांसाठी २ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो गहू वितरित करण्यात येणार असून ३ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिशिधापत्रिका २ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. १ किलो ज्वारी व १ किलो मका वितरित करण्यात येणार आहे. साखर ५०० ग्रॅम दर प्रतिकिलो १३.५० रुपये आहे. एपीएल (केशरी) शेतकरी कुटुंबासाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने, तर २ किलो तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दराने वितरित करण्यात येणार अहे. माहे आॅक्टोबर २०१५ करिता अंत्योदय योजनेकरिता प्रतिकार्ड १० किलो गहू, ज्वारी ५ किलो व मका ५ किलो उपलब्धतेनुसार व प्रतिकार्ड १५ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब गटाकरिता प्रतिव्यक्ती २ किलो गहू, १ किलो ज्वारी, १ किलो मका उपलब्धतेनुसार तसेच २ किलो तांदूळ मंजूर केला आहे. एपीएल (केशरी) शेतकरी कुटुंबासाठी माहे आॅगस्ट २०१५ करिता गहू प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे धान्य मंजूर केले आहे. ज्वारीचे व मकाचे दर प्रतिकिलो १ रुपयाप्रमाणे विक्री दर राहील, याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. माहे आॅक्टोबर २०१५ करिता कार्डधारकांना साखरेचे वाटप सुरु आहे. प्रतिमाणसी ५०० ग्रॅम तसेच सणासुदीकरिता अधिक १५० ग्रॅम असे एकूण मिळून ६५० ग्रॅम उपलब्धतेनुसार. २० आॅगस्टच्या शासन निर्णयान्वये शहरी व ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधापत्रिकांसाठी प्रतिमाह एक व्यक्तीसाठी २ लिटर, दोन व्यक्तींसाठी ३ लिटर व ३ व्यक्ती व त्याहून अधिक व्यक्तीसाठी ४ लिटर उपलब्धतेनुसार देण्यात येईल. १ गॅस तसेच २ गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकास वार्षिक १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दराने अनुज्ञेय असल्यामुळे त्यांना केरोसीन देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)