राष्ट्रवादीतर्फे विभागीय आयुक्तांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST2021-05-18T04:14:01+5:302021-05-18T04:14:01+5:30

अमरावती : कोरोेना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह ...

Provision of Oxygen Concentrator to Divisional Commissioners by NCP | राष्ट्रवादीतर्फे विभागीय आयुक्तांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

राष्ट्रवादीतर्फे विभागीय आयुक्तांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

अमरावती : कोरोेना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे प्रदान करण्यात आले. कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ते भेट म्हणून देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्याकडून कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा पाहता व लोकांना येणाऱ्या असलेल्या अडचणी लक्षात घेता, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर विभागीय आयुक्त पीयूष सिह यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व जनतेने याचा उपयोग घ्यावा, जेणेकरून ऑक्सिजनअभावी कुणाचाही मृत्यू होणार नाही, असे मनोगत शहर राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र महल्ले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी निखील ठाकरे, प्रशांत धर्माळे, नीलेश शर्मा, वहीद खान, सुचिता वणवे, संगीता ठाकरे, आकाश हिवसे, राजेंद्र दाळू, हेमंत थोरात, सूर्यकांत बाजड, डॉ. उल्हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Provision of Oxygen Concentrator to Divisional Commissioners by NCP