शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

बिल्दोरी पुलाची समस्या मार्गी

By admin | Updated: November 21, 2015 00:07 IST

आॅगस्ट महिन्यात एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर नजीकच्या बिल्दोरी पुलाची समस्या आता मार्गी लागली आहे.

विभागीय आयुक्तांनी शब्द पाळला : यशोमती ठाकुरांचाही पाठपुरावाअमरावती : आॅगस्ट महिन्यात एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर नजीकच्या बिल्दोरी पुलाची समस्या आता मार्गी लागली आहे. निविदा प्रक्रियेनंतर शनिवारी या पुलाचे भूमिपूजन होत आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सिंचन विभागाला दिले होते. पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे ६ कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला होता. ५ व ६ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे बिल्दोरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुराचा अंदाज न आल्यामुळे ६ आॅगस्टला लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी निघालेले यवतमाळ येथील आजनकर परिवारातील चार जण कारसह पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा करुण अंत झाला होता. या घटनेची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली.७२ मीटर लांबीचा पूलअमरावती : ज्या पुलावरुन कार पाण्यात कोसळली व बुडाली तो पूल नेहमीच पाण्याखाली असतो. येथे नवीन पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी दुर्गवाडा, आलवाडा व धारवाडा येथील ग्रामस्थांनी पाच दिवस पाण्यात राहून आंदोलन केले होते. परंतु त्याला यश मिळाले नव्हते. लोकमतने गावकऱ्यांचा आक्रोश व वेदना लोकदरबारात पोटतिडकीने मांडल्या होत्या. आ. यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप यानी देखील पाठपुरावा केला होता. याची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. तत्पूर्वी २ आॅगस्ट रोजी त्यांनी पूलाची पाहणी केली होती व ४ आॅगस्ट रोजी विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत या पुलासाठी निधी देणे का आवश्यक आहे, असे पटवून दिले होते. अखेर या पूलाची समस्या मार्गी लागल्याने दुर्गवाडा- धारवाडा पुनर्वसनाची समस्या निकालात निघणार आहे. बिल्दोरी नाल्यावर बांधण्यात येणारा नवीन पूल ७२ मीटर लांबीचा व साडेसहा मीटर उंचीचा राहणार आहे. निम्न वर्धाच्या बॅकवॉटरपेक्षा दीड मीटर अधिक उंच पूलाचा पृष्ठभाग राहणार आहे.याचा साडेसात कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला.