धामणगावात शिवजयंती महोत्सवाच्या तयारीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:11+5:302021-02-05T05:31:11+5:30

फोटो- विलास बीरे यांचे स्वागत करताना मराठा सेवा संघाचे पदाधिकारी. धामणगाव रेल्वे : आगामी १९ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या ...

Preparations for Shiv Jayanti festival begin in Dhamangaon | धामणगावात शिवजयंती महोत्सवाच्या तयारीला सुरुवात

धामणगावात शिवजयंती महोत्सवाच्या तयारीला सुरुवात

फोटो- विलास बीरे यांचे स्वागत करताना मराठा सेवा संघाचे पदाधिकारी.

धामणगाव रेल्वे : आगामी १९ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या शिवजयंती महोत्सवाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली पासून, मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाची सभा नंदकिशोर मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख उपस्थिती दिवाकर राऊत यांची होती. अध्यक्षपदी विलास बिरे, कार्याध्यक्षपदी शिवदास जगताप, सचिवपदी रणधीर पावडे, उपाध्यक्षपदी शिवशंकर बावस्कर, नंदकिशोर बुरघाटे, अमोल भेंडे, कोषाध्यक्षपदी गजानन भेंडे, सहसचिवपदी सुनील रोंघे, तर कार्यकारणी सदस्यांमध्ये राजेश्वर राने, राजेंद्र देशमुख, लोकेश शेंडे, राजीव कडू, हरीश संदाेकर, उमेश अरबट, प्रदीप मानकर, मनोज हांडे, राजाभाऊ पाळेकर, दिवाकर राऊत, सुनील साळुंके, सल्लागार समिती सदस्यपदी नंदकुमार मानकर, सुधीर शेळके, संजय शेंडे, विलास जाधव, मोहन इंगळे यांची निवड करण्यात आली. शिवजयंती महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन या सभेत ठरविण्यात आले.

Web Title: Preparations for Shiv Jayanti festival begin in Dhamangaon