शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:24 IST

Amravati Sub-District hospital News: अमरावतीमध्ये धारणी अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात  शनिवारी एकाच दिवसात  तीन  बालकांसह गर्भवती मातेचा  मृत्यू  झाला. धुळघाट रेल्वे  आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या नर्मदा   चिलात्रे (वय २०, रा. सालाईबर्डी) या गर्भवतीला दुपारी २:०० वाजता धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. तिची ही पहिलीच प्रसूती. तिला सिझरसाठी नेण्यात आले असता तिला झटके आले. उपचार करण्यात आले. परत दोन वेळा झटके आले आणि प्रकृती खालावली. प्रसूतीपूर्वीच माता दगावली, तर बाळ पोटातच दगावले. 

धुळघाट रेल्वे येथील श्रीराम धांडे यांची पत्नी कविताने एक मुलगी व एक मुलगा या जुळ्यांना जन्म दिला; परंतु नवजात एका बाळाच्या जन्मानंतर अल्पावधीतच मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत बैरागड येथील सबा तनवीर मो. नदीम यांना केवळ २८ आठवड्यांवर प्रसूती झाली. अकाली झालेल्या या प्रसूतीत सुमारे ८००  ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आले. अत्यल्प वजन आणि नाजूक प्रकृतीमुळे वैद्यकीय उपचार सुरू असताना या बाळाचा मृत्यू झाला.

शनिवारी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते; परंतु तिला झटके आल्याने प्रकृती खालावली. महिला दगावली, तर बाळ पोटात दगावले. सोबत अजून एका बाळाचा मृत्यू झाला आहे.  डॉ. दयाराम जावरकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, धारणी

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Tragedy at Sub-District Hospital, Pregnant Woman, Three Infants Die

Web Summary : Tragedy struck Dharani sub-district hospital as a pregnant woman and three infants died on Saturday. Complications during labor and premature births led to the unfortunate deaths. Authorities are investigating the circumstances surrounding these incidents.