लोणी येथे जुगारावर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:04+5:302021-02-05T05:31:04+5:30

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ हजार ५५० रुपये, १० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल व इतर असा एकूण १६ हजार ...

Police raid on gambling at Loni | लोणी येथे जुगारावर पोलिसांचे धाडसत्र

लोणी येथे जुगारावर पोलिसांचे धाडसत्र

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ हजार ५५० रुपये, १० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल व इतर असा एकूण १६ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शाहरुख रहमतुउल्ला (२५), शहजाद शबीर शेख (रा. सावंगा) या दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय राजेशखाँ ऊर्फ टपरी इस्माईल, छोटू शाह मौला शाह (दोघेही रा. इत्तमगाव), अनिल ऊर्फ बिवबिल ढोमणे, अहफाज पठाण हबीब पठाण, संजू गुल्हाने, लालू पारडे, अतुल उघडे, सुरेश पावडे (सर्व रा. लोणी), योगेश वांदे (रा. शिंगोरी) यांच्याविरुद्ध फिर्यादी उपनिरीक्षक दिलीप श्रीराव यांच्या फिर्यादीवरून कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पसार आरोपींचा शोध बेनोडा पोलीस घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप श्रीराव, सहायक उपनिरीक्षक सुधीर वीरखरे , जमादार दिवाकर वाघमारे, शशिकांत पोहरे, अनिल भोसले, पोलीस कर्मचारी अंकेश वानखडे, नीलेश भुयार करीत आहेत.

Web Title: Police raid on gambling at Loni