शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून येतात पायरेटेड सीडी

By admin | Updated: January 10, 2017 00:26 IST

कॉपी राईट अ‍ॅक्टनुसार सीडी व डीव्हीडी पायरेटेड सीडी विक्री करणे गुन्हा आहे.

गोरखधंदा : अश्लील सीडी विकणाऱ्यांवर धाडी टाका!अमरावती : कॉपी राईट अ‍ॅक्टनुसार सीडी व डीव्हीडी पायरेटेड सीडी विक्री करणे गुन्हा आहे. परंतु नियम धाब्यावर बसवून शहरात पायरेटेड सीडीजची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. ऐवढेच नाहीतर रस्त्यावरही कवडीमोल भावत या सीडीजचा व्यापार चालतो. यासंदर्भात सीडी विक्रेत्यांशी ग्राहक म्हणून चर्चा केली असता या सीडीज मुंबईतून येत असून याचे नेटवर्क मुंबईत असल्याची माहिती मिळाली. एखादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या चित्रपटाची किंवा त्याच्या गाण्याची सीडी अंबानगरीत पायरेसी करून उपलब्ध होते. मूळ सीडीज विक्रीचे आधिकार दिगदर्शक करार केल्यानुसार काही नामांकित कंपनीला देतात. त्याचे प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधीसुद्धा नेमलेले असतात. या प्रतिनिधींची व येथील पायरेटेड सीडीज विक्रेत्यांशी मिलीभगत असल्यामुळे त्यांना या व्यापाराची माहिती असल्यानंतरही पोलिसात तक्रार करण्यात येत नाही. जोपर्यंत पोलिसांना अशा प्रकारची तक्रार प्राप्त होत नाही तोपर्यंत पोलीसही कारवाई करीत नाही. त्यामुळे पायरेटेड सीडीज व डीव्हीडीचा हा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महिन्याकाठी याचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. २० ते ४० रुपयांमध्ये चार चित्रपट असलेली डीव्हीडी नागरिकांना सहज उपलब्ध होते. त्यामुळे यावर अंकुश कोण लावणार असा प्रश्न जागृत नागरिकांना पडला आहे. बडनेरा, रेल्वे स्टेशन चौक, राजापेठ, गांधी चौक, इतवारा, बडनेरा येथील सीडी विक्रेत्यांकडे पायरेटेड सीडीजची विक्री करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अश्लील सीडींची विक्री होत असताना पोलीस गप्प का ? ज्या दुकानात पायरेटेडच्या सीडीजची विक्री करण्यात येते. तेथे अश्लील सीडीजचाही व्यापार करण्यात येत आहे. याच दुकानामध्ये ५० ते १०० रुपयांमध्ये अश्लील सीडीजची विक्री करण्यात येत आहे. येथे कॉम्प्युटर मधुन मोबाईलच्या मेमरी कार्ड मध्ये व पेनड्राईव्हमध्ये अश्लील चित्रपटाची अश्लील चित्रपट तरुणांना उपलब्ध होते. यातून शहराममध्ये नको ते प्रकार घडत असल्याच्या घटना पुढे येत आहे. हा प्रकार पोलिसांना माहिती असल्यानंतरही कारवाई का करीत नाही? ते गप्प का, हा सवाल अमरावतीकर विचारत आहेत.