शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘भुताच्या यात्रे’त पेटला लाखोंचा कापूर

By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST

तीनशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सावंगा विठोबानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंचा कापूर पेटला.

सावंगा विठोबात भक्तांची मांदियाळी : गुढीपाडव्याच्या यात्रेला विशेष महत्त्व चांदूर रेल्वे : तीनशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सावंगा विठोबानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंचा कापूर पेटला. लक्षावधी भक्तांनी या भुताच्या यात्रेत हजेरी लाऊन कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. समतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या देव व भक्तांच्या ७० फूट उंच दोन झेंड्यांना गुढीपाडव्याला नवीन खोळ चढविण्यात आली. येथील दिव्य धार्मिक विधी भाविकांनी त्यांच्या हृदयात जपून ठेवत आराध्याचे आशीर्वाद घेतले. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या यात्रेला मंगळवारपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी आप्तजनांच्या वजनाएवढा कापूर जाळून नवस फेडला व भोजनदान केले. पारंपारिक झांज व मृदंगाच्या साथीने संपूर्ण परिसर अवधुती भजनात रंगला होता. मंदिराचे विश्वस्त गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, विनायक पाटील, रूपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, कृपासागर राऊत, अनिल बेलसरे, दिगंबर राठोड, पुंजाराम नेमाडे, स्वप्निल चौधरी यांनी महोत्सवासाठी प्रयत्न केले. ७० फूट झेंड्यांना नवी खोळदेव व भक्तांच्या प्रतिकात्मक दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्यास दुपारी ४ वाजता सुरुवात झाली. चरणदास कांडलकर यांनी कृष्णाजी महाराजांच्या बोहलीचे दर्शन घेतले. विधीवत पूजनानंतर दोन झेंड्यांना पायांचा स्पर्श न करता दोरखंडाच्या सहायाने जुनी खोळ काढली व ते उंच टोकावर पोहचले. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत कांडलकर खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा दोन तास चालला.पाणीटंचाईची झळ सावंगा विठोबा ग्रापने गावकऱ्यांसह यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था न केल्याने सावंग्यात पाणीटंचाई जाणवत होती. ग्रापंने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला. मात्र, अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नसल्याची ओरड होती. महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याने गैरसोय झाली. आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सोईसाठी अ‍ॅब्युलन्स व डॉक्टरांची व्यवस्था केली होती.चोख बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ अविनाश पालवे यांनी १६ पोलीस अधिकारी व ११३ पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण दलाच्या जवानांनी यात्रे दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहिली. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बंदोबस्त व भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले.