मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण

By Admin | Updated: March 8, 2015 00:12 IST2015-03-08T00:12:42+5:302015-03-08T00:12:42+5:30

मेळघाटातील प्रत्येक गावात गुरुवार पासून बहुप्रति होळी सणाला सुरुवात झाली आहे. आपापल्या सोयीनुसार गावाच्या पुर्व दिशेला हिरव्या बांबुची होळी ...

Phagwa and Panchami festival fall in Melghat | मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण

मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण

श्यामकांड पाण्डेय धारणी
मेळघाटातील प्रत्येक गावात गुरुवार पासून बहुप्रति होळी सणाला सुरुवात झाली आहे. आपापल्या सोयीनुसार गावाच्या पुर्व दिशेला हिरव्या बांबुची होळी उभी करुन दिवसभर नारळ व गाठ्यांचा हार बनवून होळी मातेची पूजा केली जाते. सायंकाळी गावातील पोलीस पटेल किंवा पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत आडा पटेल (गावाने नेमलेला पटेल) सपत्नीक पुजा करण्यात येतो. यावेळी त्यांच्यासोबत ढोल, बासुरीच्या तालात गीत गात महिला येतात.
होळीच्या अवती भवती फिरुन गीताच्या व संगीताच्या सुरात पुजा अर्चना करण्यात येते. त्यानंतर पोलीस पाटलांच्या हस्ते होलीकाचे दहन करण्यात येते होळी जाळल्यानंतर ती होळी पुर्व दिसेलाच खाली पडायला पाहीजे यासाठी नवयुवक मंडळी विशेष दक्षता घेतात. पुर्वेस होळी पडल्यास वर्षभर आनंद व सुखाचे वातावरण राहतो अशी मान्यता आहे. होळी जळाल्यानंतर सर्वांचे एक दुसऱ्यांशी भेटी, गाठी सुरु होते. मोठ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेण्यात येते. तसेच समवयस्कात गळाभेटीची परंपरा आहे.
होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावात फगवा उत्सवाला सुरुवात होते. गावातील उत्साही मंडळी फगवा गीत गाऊन गावातील प्रतिष्ठितांकडे जाऊन आपल्या हक्काचा फगवा वसुल करतात फगवामध्ये रोख रकमेसह धान्यही दिले जातात. यासाठी प्रत्येक चमुत फगवा वसुल करणारे झोळी तयार करुन घरोघरी फगवा मागतात या फगवाने जमा झालेल्या रकमेने गावाबाहेर आमराईत सामुहिक जेवण तयार करण्यात येते व जेवण्याचा आस्वाद लुटला जातो.

Web Title: Phagwa and Panchami festival fall in Melghat