शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीला विलंब झाल्यास महावितरणला दंड

By admin | Updated: September 29, 2014 22:52 IST

कालबद्ध स्वरुपात सेवा मिळण्यास विलंब होत असेल आणि त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असेल तर महावितरणला दंड ठोठावण्याबाबत विद्युत नियामक आयोगाने नव्याने नियमावली लागू केली आहे.

जितेंद्र दखने - अमरावतीकालबद्ध स्वरुपात सेवा मिळण्यास विलंब होत असेल आणि त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असेल तर महावितरणला दंड ठोठावण्याबाबत विद्युत नियामक आयोगाने नव्याने नियमावली लागू केली आहे. वीज जोडणीसाठी कालमर्यादा निश्चित करून सेवेचा दर्जा सुधारण्यावर आयोगाने भर दिला आहे. त्यामुळे महावितरणला नियमावलीनुसार काम करावे लागणार आहे. नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास किमान वेळेत पूर्ववत होण्यासाठी कालबद्ध वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. वर्ग १ व शहरी भागात चार तासांत, ग्रामीण भागात १८ तासाच्या आत वीज पुरवठा पूर्ववत व्हावा, असे नियमावलीत म्हटले आहे. रोहीत्र भूमिगत यंत्रणेमधील बिघाड दुरूस्त करण्यासाठी लागणारा कालावधी गृहीत धरून वेळापत्रक ठरवून दिले आहे. वीज बिल न भरल्यास खंडीत केलेला वीज पुरवठा वर्ग १ शहरांत चार तास, शहरांत २४ तासात आणि ग्रामीण भागात दोन दिवसांत पुन्हा जोडणे अपेक्षित आहे. इतर तक्रारींची नोंद कशा पद्धतीने घ्यावी, याचे वेळापत्रक सुध्दा आयोगाने ठरवून दिले आहे. नवीन जोडणीसंदर्भात वर्ग १ शहरी भागात अर्ज केल्यापासून सात दिवसांत आणि ग्रामीण भागात दहा दिवसांच्या आत पाहणी करणे आवश्यक आहे अन्यथा प्रति आठवडा शंभर रूपये दंड होऊ शकतो. सध्याच्या यंत्रणेतून जोडणी द्यायची असल्यास १५ दिवसांत वर्ग १ व शहरी भागात आणि ग्रामीण भागातील ग्राहकाला २० दिवसांत जोडणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक द्यावे लागणार आहे.