शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पितृछत्र हरविलेल्या ढोक कुटुंबाला दिला आधार

By admin | Updated: August 12, 2015 00:13 IST

'माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला.

मुलींची व्यथा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकारवरुड : ''माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला. आम्हाला घर नसते तरी चालले असते मात्र आज आमचे वडील राहिले असते तर आमच्यावर मायेचा हात राहिला असता, परंतु आज माझे बाबा नसल्याचे दु:ख आहे. अनेक आलेत, शब्दाने सांत्वना करुन निघून गेलेत. असे वाटले की सर्व शब्दांचा खेळ असतो. बोलण्यापुरते सर्वच असतात. परंतु बाबा गेल्यावर सख्ख्या भावाप्रमाणे खा.राजू शेट्टे साहेब समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या कृतीतून आम्हा भावंडांना आशेचा किरण मिळाला.'' असे म्हणत मृत शेतकऱ्याची मुलगी श्वेता हिला अश्रू आवरता आले नाही. यावेळी संपूर्ण सभामंडपातील उपस्थितांच्या डोळयात अश्रू तरळले होते. केवळ कर्जामुळे माझे वडील शिवहरी ढोक यांनी जीवनयात्रा संपविली. घरात वंशाचा दिवा नसताना पत्नी रमाबाई आणि तीन मुली डिंपल, श्वेता आणि संपदा एवढाच परिवार होता. वडील गेल्याने ढोक परिवार उघड्यावर आला. उरले ेहोते ते केवळ आईचे प्रेम. आईने काय करावे हा प्रश्न होता. शिक्षण शिकवावे की, विवाहाची तडजोड करावी. यामुळे संपूर्ण ढोक परिवार चिंताग्रस्त झाला होता. आम्हाला आज त्यांचा आधार मिळाला नसता तर आम्हीसुध्दा संपलो असतो, अशा शब्दात हुंदके देत ती रडत होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर राजकारण करणारे अनेक येऊन गेले. आप्त, स्वकीय आलेत, राजकारणी आणि आप्तेष्टांनी केवळ शाब्दिक धीर देण्यापलीकडे काहीच केले नाही तर आमदार, खासदारांनी आश्वासनांची लाखोली वाहिली. आम्ही ‘आज मिळेल, उद्या मिळेल’ या आशेने जगत होतो. एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना कळली आणि ते सरळ खानापूरच्या दिशेने निघाले. यावेळी आम्हाला आमच्या अडचणी विचारल्या. तेव्हा मी सांगितले कर्जापायी आमचा बाप गेला. तो मिळणार नाही, घर मिळेल, शिक्षणाचा खर्चही मिळेल आणि खायला अन्नसुध्दा मिळले. परंतु माझे ेवडील परत येणार नाही, असे हुंदके देत देत सांगत असताना खा. शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर आणि देवेंद्र भुयार यांच्या रुपाने भावाची माया मिळाली. तेव्हा केवळ आम्हाला शौचालय आणि स्नानगृह द्या, असे सांगितले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी खा.शेट्टी यांनी आम्ही पूर्ण घर बांधून देतो, असे सांगितले आणि तेव्हापासूनच घराची मुहूर्तमेढ रोवली. कुणाचा यावर विश्वास बसत नव्हता. मात्र इतरांप्रमाणे हे आश्वासन देऊन निघून न जाता दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली. आज शहीद क्रांतिदिनी ते घर मिळाले. याचा आनंद असला तरी मात्र आमचे वडील राहिले नाही, हे दु:ख कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच प्रार्थना आहे. यामुळे शेतकऱ्यांवर कितीही संकट आले तरी कुणी आत्महत्या करुन जीव गमावू नका आणि आपला संसार उघड्यावर आणू नका, असे आवाहन तिने केले. यावेळी संपूर्ण सभामंडप नि:शब्द होऊन अश्रू ढाळत होता. (तालुका प्रतिनीधी )