शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST

शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन, कोरोना संक्रमितांच्या संख्येत कैकपटींनी वाढ (असायमेंट) अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन ...

शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन, कोरोना संक्रमितांच्या संख्येत कैकपटींनी वाढ (असायमेंट)

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे शाळा बंद असून, शाळकरी मुले घरीच आहेत. कुटुंबातील सदस्य मास्क वापरासह कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करतात का, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, बहुतांश पालक मास्कसह सूचनांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना मास्क वापराबाबत आठवण द्यावी लागते, अशाच प्रतिक्रिया आल्या आहेत.

जिल्ह्यात दरदिवशी ८०० ते ९०० कोरोना संक्रमित निष्पन्न होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बाधितांची संख्या ३२ हजार ८३५ झाली आहे. त्यातील ४८७ रुग्णांचा बळी गेला. रुग्णालयातील उपचारानंतर ............. जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना लसीकरण सुरू असले, तरी सर्वसामान्यांना लस मिळण्यास विलंब होत आहे. लसीचे दोन व एक बूस्टर डोज पूर्ण झाल्यानंतर अँटिबॉडीज शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे या उपाययोजना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत करतात. हीच बाब मध्यंतरी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितली होती. घरातील सदस्यही याबाबत चर्चा करीत असल्याने आम्हाला या उपाययोजनांची माहिती झाली. त्यामुळे बाहेर जाताना आम्ही मास्क घालतो. घरी आल्यानंतर हात धुतो. कोणी याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांनाही सूचनांची आठवण करून दिली असल्याचे मुलांनी सांगितले.

------------------

स्वत:ची काळजी घ्या आणि आई-बाबांचीही

- प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच, तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.

- आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेररून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का, सॅनिटायझर वापरले का, हेही पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.

-------------------

कोरोना संक्रमितांचे प्रमाण गत १५ दिवसांपासून वाढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. कामानिमित्त बाहेर गेल्यावर सुरक्षित अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. घरी गेल्यानंतरही हात-पाय स्वच्छ धुवा. शक्य झाल्यास आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. या सूचनांचे पालन केले, तर कोरोनाला अटकाव करण्यास मोठी मदत होणार आहे.

- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

-----------------

(मुलाचे फोटो घेणे अनिवार्य)

माझे वडील कर्मचारी असल्यामुळे आम्ही सक्तीने कोरोनाचे सर्व नियम पाळतो. आई बाजारपेठेत जाताना मास्क विसरली, तर तिला आठवण करून देतो. कोणी सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांना सूचनांची आठवण करून दिली जाते.

- कार्तिक कोहळे, अमरावती.

-----------------

आई-वडील कामानिमित्त बाहेर जाताना मास्क विसरले, तर त्यांना आठवण करून देते. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ करूनच ते घरात येतात. घरी येणाऱ्यांना कोरोनाच्या उपाययोजनांची आठवण करून दिली जाते.

- अंकिता रोकडे, बडनेरा

---------

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर जाताना मास्क वापरावा, असा माझा अट्टाहास असतो. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही आठवण करून दिली जाते.

- पियू मराठे, अमरावती.

--------------

वडील एमएसईबीत कंत्राटदार असल्याने त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. बाहेर जाताना त्यांना मास्क आवर्जून घालायला लावतो. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरने हात धुण्यास सांगितले जाते.

- साहिल राऊत, बडनेरा

-------------

मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने मास्कसह इतर बाबींकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु नंतर कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे आता लॉकडाऊन लागू केले. मास्कसह इतर सूचनांचे पालन करतात. कुटुंबातील सदस्य घराबाहेर जात असतील, तेव्हा आम्ही त्यांना मास्कही आठवण करून देताे.

- किरण पाटील, मोथा, चिखलदरा

--------------------

कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने शाळा बंद झाल्या आहेत. आम्ही मास्क घालूनच बाहेर जातो. कुटुंबातील सर्वांना सूचनांचे पालन करण्याबाबत सांगितले जाते.

- शिवानी कासदेकर, जैतादेही, धारणी