सर्दी-खोकल्यावर रामबाण ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:01:03+5:30

मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक प्राचीन व आयुर्वेदिक पद्धतीचाही वापर केला जातो, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही.

Panacea for cold and cough. | सर्दी-खोकल्यावर रामबाण ।

सर्दी-खोकल्यावर रामबाण ।

Next
ठळक मुद्देबिबा, केरोसीन, चहापत्तीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील आदिवासी अघोरी डंबा पद्धतीचा वापर पोटफुगी व इतर आजार बरा करण्यासाठी करत असले तरी सर्दी खोक ल्यापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांच्या गळ्यातील लसणाच्या कळ्यांचा हार हा रामबाण आहे. मेळघाटातील अनेक बालकांच्या गळ्यात तो हार दृष्टीस पडतो.
मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक प्राचीन व आयुर्वेदिक पद्धतीचाही वापर केला जातो, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही. त्यातून त्यांचे आजार बरे होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. सर्दी-खोकलासारख्या आजारावर आजही शासकीय दवाखान्यातील औषधीसोबत लसूण कळ्यांचा हार लहान बालकांच्या गळ्यात बांधला जातो. कोयलारी येथील हिराजी सावजी मावस्कर यांनी त्यांच्या दोन वर्षीय नातवाला सर्दी-खोकला झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. त्याच्या गळ्यात लसूण कळ्यांचा हार होता. मेळघाटात पावसाळा लागताच अनेकांना सर्दी-खोकला यापासून न्यूमोनिया सारखा आजार होतो. त्यावर विविध उपायांसह बिबा, केरोसिन व चहापत्तीचा जखम सुकण्यासाठी वापर केला जातो.

मेळघाटातील आदिवासी बालकांच्या गळ्यात लसूण कळ्यांचा हार दिसून येतो. ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे त्यातून गळा मोकळा होतो. सोबतच आदिवासी केरोसीन, चहापत्ती, बिबा आदींचाही वापर शरीरातील विविध व्याधी, दुखण्यांपासून मुक्त होण्यासाठी करतात.
- आदित्य पाटील
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

Web Title: Panacea for cold and cough.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य