शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांना गळती

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

संजय खासबागे  वरूडविदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. तीन वर्षांपासूनच्या सतच्या नापिकीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांकडे खरिपाच्या मशागतीकरिता आर्थिक तरतूद नसल्याने शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यात १६ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक आहे. सद्यस्थितीत तापमान ४४ ते ४५ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संत्र्याचा आंबिया बहर गळत आहे. गळतीचे प्रमाण ४० ते ५० टक्के असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन विकली तर अनेकांची सावकारांच्या घशात गेली आहे. शेतजमिनी, मालमत्ता विक्रीपत्र, इसारचिठ्ठीसारख्या कागदपत्रांचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी गहाणात मालमत्ता ठेवली आहे भूमाफियांनी त्या जमिनी हडपल्या आहेत. आता वाढत्या तापामानाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह सोहळे स्थगित होत आहेत. अनेकांना पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाकरिता बी- बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीवर हजारो रुपये खर्च करावा लागतो. परंतु पैसाच नसल्याने अद्याप शेतीची मशागत सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, अनुदानावर खतांचा पुरवठा करावा तर मशागतीकरिता पीककर्जाचे मे महिन्यातच वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.