शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराचे नेटवर्क जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

पान २ ची लिड सुमीत हरकूट चांदूर बाजार : शहरासह जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ऑनलाइन जुगाराचे पेव फुटले असून, शाळकरी ...

पान २ ची लिड

सुमीत हरकूट

चांदूर बाजार : शहरासह जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ऑनलाइन जुगाराचे पेव फुटले असून, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण आणि नोकरदार मंडळी मोठ्या प्रमाणात या ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाताना दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे, तर या जुगाराच्या नादाला लागून अनेक कुटुंबांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

ऑनलाईन जुगारामध्ये आजकल बिंगो, रमी, रेस, तीन पत्ती या प्रमुख चार प्रकारची चलती असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ऑनलाईन जुगाराची अनेक केंद्रे आहेत. त्यांच्या चालकांनी आपापल्या सोयीनुसार या ऑनलाईन जुगाराचे अ‍ॅप विकसित केली आहेत. ज्याला कुणाला यापैकी कोणताही जुगार खेळायचा असेल, त्याला सर्वांत आधी त्या जुगार सेंटरच्या अधिकृत सभासद व्हावे लागते. त्यानंतर काही ठरावीक डाऊन पेमेंट संबंधित जुगार खेळविणाराला जमा करावे लागते. सभासद झाल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर हवे असेल, ते किंवा सगळ्या प्रकारच्या ऑनलाइन जुगाराचे अ‍ॅप डाऊनलोड केले जातात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या कोणत्याही वेळी आणि कितीही रकमेचा जुगार खेळता येतो.

जुगारासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

ज्यांच्याकडे स्मार्ट फोनची सुविधा नसेल किंवा जो सभासद नसेल, त्यांना थेट जुगार अड्ड्यावर जाऊन संबंधित जुगार चालकाचा मोबाइलवर किंवा संगणकावर जुगार खेळण्याची सोय केली जाते. अशी चर्चा सुद्धा शहरात जोर धरत आहे. तर अशा प्रकारच्या आॅनलाइन जुगार खेळणाºयाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दर दिवसाच्या जुगारामधील घडामोडी आणि चढ-उतार शेअर केले जातात. यात ग्रामीण भागात आॅनलाईन जुगार खेळणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

असा आहे ऑनलाईन जुगार

बिंगो या जुगारामध्ये कसिनोप्रामणे फिरते चक्र असते. चक्रासोबत फिरणारी गोळी ज्या आकड्यावर स्थिरावेल तो आकडा लागला असे समजायचे. रमी आणि तीन पत्तीचा डाव हा पत्यातील डावाप्रमाणेच असून रेस हा जुगारसुद्धा घोड्याच्या रेसवरचा आधारित आहे. कोणी कधी जुगार खेळला किती रकमेचा खेळला त्याच्या सगळ्या नोंदी संबंधित जुगार अड्डा संचालकाच्या संगणकावर ऑनलाईन होतात. यापैकी जवळपास सगळे जुगार दहा रुपयांपासून सुरू होतात. जिंकणाºयाला लावलेल्या रकमेचे दहापट रक्कम मिळते. मात्र यामध्ये जिंकणाºयांची संख्या बोटावर मोजण्याइतकी ही दिसत नाही.

संपूर्ण व्यवहार कॅशलेस

या ऑनलाईन जुगाराचे जवळपास सगळे व्यवहार ऑनलाईन चालतात. सभासदाने भरलेले डाऊन पेमेंट पुन्हा संपले की, पुन्हा भरणे बक्षिसाची रक्कम ज्याच्या त्याच्या बँक खात्यावर वर्ग करणे आदी आर्थिक व्यवहार ऑनलाइन चालतात. हे ऑनलाईन जुगार अड्डेच ऑनलाईन असल्यामुळे पोलिसांना याचा सुगावा लागत नाही. मात्र, पोलिसांनी मनात आणले, तर सहजासहजी त्यांच्या सुगावा लागू शकतो.