एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीचे लग्न मोडले

By Admin | Updated: June 22, 2014 23:46 IST2014-06-22T23:46:35+5:302014-06-22T23:46:35+5:30

एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलीचे चोरुन विवस्त्र छायाचित्र काढून तिचे लग्न मोडणाऱ्या शिक्षकाला चांदूरबाजार पोलिसांनी गजाआड केले. ही घटना नजरपूर गावात घडली.

In one-off love, he broke the marriage of the girl | एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीचे लग्न मोडले

एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीचे लग्न मोडले

बेलोरा : एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलीचे चोरुन विवस्त्र छायाचित्र काढून तिचे लग्न मोडणाऱ्या शिक्षकाला चांदूरबाजार पोलिसांनी गजाआड केले. ही घटना नजरपूर गावात घडली.
हरीश दिगंबर वाहने (३४, रा. नजरपूर), असे आरोपीचे नाव आहे. तो तिवसा तालुक्यात सुरुवाडी येथील मतिमंद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील नजरपूर येथील पोलीस पाटील आहेत. याबाबत पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हरीश वाहने हा त्या मुलीच्या गावातच राहतो. दोन्ही कुटुंबात कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आरोपीची त्या मुलीच्या घरी ये-जा होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. मुलगी घरात कपडे बदलविताना अथवा आंघोळीला गेल्यास तो मोबाईलमध्ये तिचे चोरुन छायाचित्र घेत होता.
याच दरम्यान मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरु होते. वरुड तालुक्यात जामगाव येथे तिचा विवाह निश्चित करण्यात आला. लग्नाची बोलणी झाली आणि विवाहाची तारीखही ठरविण्यात आली. दोन्हीकडे विवाहाच्या तयारीची लगबग सुरु होती. दुसरीकडे एकतर्फी प्रेम करणारा शिक्षक हरीश त्या मुलीचा विवाह मोडण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत होता. त्याने सर्वप्रथम त्या मुलीला अडवून लग्नाची गळ घातली आणि आपल्याकडे विवस्त्र छायाचित्र असल्याचे सांगितले. परंतु त्या मुलीने त्याच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने १४ जून रोजी तिच्याशी लग्न जुळलेल्या मुलाच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने निनावी पत्र पाठवून लग्न मोडण्यासंदर्भात सुचविले.

Web Title: In one-off love, he broke the marriage of the girl