शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एक हेक्टर जमिनित स्ट्रॉबेरी, गहू, फुलकोबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST

पान २ चे बॉटम टँकरग्रस्त मोथा : उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग लोकमत विशेष नरेंद्र जावरे चिखलदरा : उन्हाळ्यात ...

पान २ चे बॉटम

टँकरग्रस्त मोथा : उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

चिखलदरा : उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण असताना, टँकरग्रस्त असे विशेषण लागले असताना, त्याच मोथा गावातील उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने एका हेक्टरमध्ये स्ट्रॉबेरी, गहू, कोबी, लसूण, वांगी, टमाटर, मिरची अशी विविध पिके घेत मेळघाटातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

गजानन शनवारे असे या युवा शेतकऱ्याचे नाव. वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिकांना फाटा देत सहा वर्षांपासून ते नवनवीन प्रयोग करीत आहेत. मेळघाटसारख्या भागात लाल माती व खडकाळ जमिनीत मुबालक पाणी नसताना, कमी पाण्यात जास्त पिके घेण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरू लागला आहे. स्वत: शेतात राबून गजानन शनवारे या उत्पादनावर कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत.

दुष्काळग्रस्त गावात ठिबक

चिखलदरापासून अवघ्या सहा किलोमीटर, परतवाडा मार्गावरील मोथा गावाला स्मार्ट ग्राम म्हणूनसुद्धा पुरस्कार मिळाला. गावात तलाव, विहीर असली तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत गजानन शनवारे यांनी शेतातील विहिरीच्या भरवशावर स्प्रिंकलरचा वापर व ठिंबक सिंचनाद्वारे शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत.

बॉक्स

१ लाखात ३ लाखांचे उत्पन्न

उच्चशिक्षित गजानन शनवारे यांनी शासकीय नोकरीसाठी काही वर्षे प्रयत्न केले. मात्र, यश मिळाले नाही. त्यामुळे घरच्या एक हेक्टर जमिनीवर विविध प्रयोग करण्याचे ठरविले. कृषिमित्र म्हणून त्यांची निवड झाली. पाणी फाउंडेशनसह शिवाजी कृषी शाखेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी जाऊन त्यांनी शेतात प्रयोग करण्यास सुरुवात केली. स्ट्रॉबेरी ते मिरची रोपासाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केले. त्यातून त्यांना ३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

-----------------------