शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर शेती, तीही पाण्याखाली

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी

शेताचे झाले तळे : जगावं कसं? भेलकर कुटुंबाचा सवालअमरावती : तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी या शेतात जमा होते. एका पावसाने शेताचा तलाव तयार झाला, सोयाबीन पाण्याखाली सडले. आता जगावं कसं, असा प्रश्न या परिवारासमोर उभा ठाकला आहे. शेंदूरजनाबाजार ते रघुनाथपूर रस्त्यावर रामदास भेलकर यांचे शेत सर्व्हे नंबर १४७/३ एक एकर शेत आहे. या शेतावर भेलकर परिवाराची उपजिविका, लगतच्या रस्त्याचे मातीकाम व खडीकरण करताना रस्त्यावर रपटा किंवा पूल बांधण्यात आला नाही. तसेच रस्त्याच्या काठाने नाली काढण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस आल्यास लगतच्या सर्व शेतामधील पाणी भेलकर यांच्या शेतात जमा होते. शेतामधील पीक सडून जाते. यंदादेखील भेलकर यांनी सोयाबीनचे महागड बियाने, खत, पेरणी व मजुरी असे १० हजार रूपये खर्च केले, सोयाबीन पेरणीदेखील साधली होती. पीक डौलात असताना पावसाच्या पाण्यामुळे शेतात तळ साचले. सोयाबीन पाण्याखाली सडत आहे. भेलकर परिवाराजवळ एक एकर शेतीशिवाय उपजिवीकेचे दुसरे कुठलेच साधन नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन, विनंती, आर्जव सर्व काही झाले. शेतकऱ्यांचे नुकसान दिसत असताना यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे जगावं कसं, हा भेलकर परिवाराचा अस्वस्थ करणारा सवाल आहे. (प्रतिनिधी)