शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'वरली-मटका किंग'ना 'बाजीराव'चा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:17 IST

जुगार अड्ड्यावरील पालकमंत्र्यांचा छाप्याचा हादरा पोलीस आयुक्तालयाला बसला.

धाबे दणाणले : १७ सट्टा व्यावसायिकांची सीपींसमोर पेशीअमरावती : जुगार अड्ड्यावरील पालकमंत्र्यांचा छाप्याचा हादरा पोलीस आयुक्तालयाला बसला. पीआयसह पाच पोलिसांचे निलंबन झाल्याने पोलीस वर्तळात खळबळ उडाली आहे. दोन दिवसात तब्बल १७ 'वरली-मटका किंग' ची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर करण्यात आली. त्यांना पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे कायमस्वरुपी बंद ठेवण्यासाठी तंबी देऊन बाजीराव पट्ट्याचा प्रसाद दिल्याचे आरोपींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते. दसऱ्याच्या दिवशीच सिंघम पालकमंत्र्यांनी धाड टाकून जुगाऱ्यांना पकडून दिले. ही कारवाई पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेला चव्हाट्यावर आणणारीच ठरली. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील या प्रकाराची दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांची बैठक बोलावून अवैध व्यवसाय कायमचे बंद झालेच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यातच शहरातील वरली किंगची पेशी करण्याचे निर्देश ठाणेदाराला दिले. त्यानुसार गुरुवारी शहरातील १३ व शुक्रवारी सात वरली किंगची पोलीस आयुक्तांसमोर पेशी करण्यात आली होती. एक-एक वरली किंगची पेशी होत होती. हे वरली किंग आयुक्तांच्या दालना गेल्यानंतर आतून बाजीराव पट्ट्याच्या आवाजासोबत वरली किंगंचा आरडाओरड ऐकू येत होती. वरली किंग सीपींच्या दालनाबाहेर निघाल्यानंतर त्यांना बाजीरावचा प्रसाद मिळाल्याचा अंदाज येत होता. त्यांच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो अंदाज येत होताच. सीपीच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलीस वर्तळातही प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांकडून रवी गुप्ताची कानउघाडणीबच्छराज प्लॉट येथील जुगारावर पालकमंत्र्यांनी धाड टाकल्यानंतर मुख्य आरोपी रवी गुप्ता पसार झाला. त्याने न्यायालयातून जामीन मिळविला असून त्याची पेशीसुद्धा सीपींसमोर करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी आरोपी रवि गुप्ताचीही चांगलीच कानउघाडणी करून अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्यासाठी तंबी दिली. शहरात अवैध व्यवसाय खपवून घेणार नाही. ते कायमस्वरुपी बंद व्हावेत, अशी तंबी वरली किंगला दिली. याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी कळवावे, कारवाई करू. आवश्यक वाटल्यास मी रस्त्यावर उतरेन. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती