शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली व पाच टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. आतापर्यंत ७,८९,३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ६,९६,८४० डोस प्राप्त झालेले आहेत. यात ५,४१,३३० कोविशिल्ड, तर १,५५,५१० कोव्हॅक्सिनचा समावेश आाहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत साधारणपणे ११० लसीकरण केंद्रे आहेत. 

ठळक मुद्देअमरावती तालुक्यात सर्वाधिक ३२.८५ टक्के, चिखलदरात सर्वात कमी ६.९२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात नियमितपणे लसींचा पुरवठा होत नसल्याने नेहमीच अर्धेअधिक केंद्र बंद राहतात. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत लोकसंख्येच्या तुलनेत २२.२४ टक्के लसीकरण झालेले आहे.  जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार ३२३ झालेली आहे तर मृत्यू १,५५८ झालेले आहे. यामध्ये दर ३० नागरिकांमागे एक व्यक्ती कोरोनाग्रस्त झालेला असल्याचे वास्तव आहे. अशावेळी कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. मात्र, यात पुरवठ्याचा खोडा आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आतापर्यंत अर्धाच लसींचा साठा मिळाल्याने ही मोहीम नियमित राहत नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली व पाच टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. आतापर्यंत ७,८९,३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ६,९६,८४० डोस प्राप्त झालेले आहेत. यात ५,४१,३३० कोविशिल्ड, तर १,५५,५१० कोव्हॅक्सिनचा समावेश आाहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत साधारणपणे ११० लसीकरण केंद्रे आहेत. 

असे आहे टप्पानिहाय लसीकरण जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर ३५,४६६, फ्रंटलाईन वर्कर ५६,१६२,  याशिवाय १८ ते ४४ वयोगटात १,१८,५८१, ४५ ते ५९ वयोगटात २,४२,४२४ व ६० वर्षांवरील २,५५,१६२ ज्येष्ठ नागरिकांमध्ये आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. लसींचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने अमरावती, अचलपूर व वरूड तालुक्यातील केंद्रांवर पहाटेपासून रांगा असल्याचे चित्र आहे.

लसीकरणात पुरुषच आघाडीवररविवारपर्यत झालेल्या लसीकरणात पुरुषच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामध्ये ३,७६,१६८ पुरुष व ३,२९,७७० महिलांचे लसीकरण झालेले आहे. याशिवाय ७५ तृतीय पंथीयांचे लसीकरण झालेले आहे. अमरावती शहरात १,५६,९१४ पुरुष व १,३५,७५० महिला, वरूड तालुक्यात ३१,३४० पुरुष व २८,६५२३ महिलांचे लसीकरण झालेले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या