शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

आता उरले पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:17 IST

पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याबँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे.

लगबग : हजार-पाचशेच्या जुन्या नोटा जमा करण्याची मुदत संपणार अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याबँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे. आता अवघे पाच दिवस शिल्लक असून नोटा भरण्यासाठी बँकात पुन्हा एकदा गर्दी उसळण्याचे संकेत आहेत. सोबतच समस्त नागरिकांनी पंतप्रधानांच्या नव्या निर्णयाची धास्ती घेतली आहे. ३० डिसेंबरनंतरही देशभराबरोबर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्याचे चित्र नाही. ८ नोव्हेंबरला एका निर्णयाद्वारे शासनाने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यात. तेव्हा हे रद्द झालेले चलन बदलून घेण्यासाठी बँकांना ३० डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. याकालावधीत जिल्हाभरातील बँकांमध्ये २ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम पाचशे आणि हजारांच्या चलनात जमा झाली आहे. नोटाबंदीनंतर बँकाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून ‘कॅश शॉर्टेज’चा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी व्यवहार सुरक्षित होण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. एकीकडे ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले तरी दुसरीकडे त्यासाठी असणारी व्यवस्था तोकडी असल्याने ही घोषणाही प्रत्यक्षात कुचकामी ठरली आहे. जिल्ह्यात खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३३१ शाखा आहेत. यातील स्टेट बँक सोडल्यास सर्वच बँकांमध्ये ‘कॅश’ची समस्या आहे. त्यातही स्टेट बँकेतही ‘कॅश शॉर्टेज’चा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभरातून २४ हजारांचा विड्रॉल देणे अनेक बँकांना अद्यापही साध्य झाले नाही. यातच शेवटच्या पाच दिवसांत जुने चलन भरण्यासाठी गर्दी वाढणार असल्याने बँकांमधील व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. नागरिकांमध्ये अद्यापही चलनटंचाईची भीती कायम आहे. (प्रतिनिधी) ५०० आणि १०० चे चलन पोहोचले शहराच्या अनेक एटीएममध्ये ५०० आणि १०० चे चलन पोहोचल्याची सुखावह गोष्ट घडली आहे. आतापर्यंत एटीएममधून नव्या चलनातील २ हजारांची एकच नोट मिळत असल्याने नागरिक हैराण होते. मात्र, रविवारी अनेक एटीएममधून १०० च्या नोटांच्या चलनामध्ये नागरिकांना रक्कम काढता आली. कितीही नोटा स्वीकारणार ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा केवळ पाच हजार रुपयांच्या मर्यादेत स्वीकारणार असल्याचा निर्णय आरबीआयने घेतला होता. मात्र तो निर्णय बदलण्यात आला आहे.