शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
5
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
6
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
7
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
8
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
9
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
10
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
11
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
12
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
13
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
14
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
15
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
16
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
17
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
18
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
19
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
20
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
Daily Top 2Weekly Top 5

लेआऊटमधील १0 टक्के जागा आता महापालिकेची

By admin | Updated: May 20, 2014 23:18 IST

महापालिका क्षेत्रातील नव्या लेआऊटचा विकास करायचा असेल तर आता भूखंड मालकाला १0 टक्के जमिन महापालिकेला द्यावी लागणार आहे.

अमरावती : महापालिका क्षेत्रातील नव्या लेआऊटचा विकास करायचा असेल तर आता भूखंड मालकाला १0 टक्के जमिन महापालिकेला द्यावी लागणार आहे. त्यातूनच महापालिका ले-आऊटचा विकास करुन येथे रस्ते, पथदिवे, नाल्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करुन देणार आहे. मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या आमसभेमध्ये शहरातील नवीन लेआऊटमधील विकासासंबंधी नवीन धोरण ठरविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनातर्फे ठेवण्यात आला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेमध्ये शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम व नगर रचना विभागाला नगरसेवकांनी चागंलेच धारेवर धरले. राजेंद्र तायडे, सुनील काळे, तुषार भारतीय, अर्चना इंगोले, प्रकाश बनसोड, प्रदीप बाजड, प्रशांत वानखडे, जयश्री मोरया यांनी त्यांच्या प्रभागात अधिकार्‍यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. अर्चना इंगोले यांच्या प्रभागात तब्बल ९ भूखंड मालकांनी नाल्याकाठची जमिन प्रशासनाच्या माथी मारली आहे. ज्यावेळी या भागाच्या विकासासाठी भूखंड मालकांकडून मिळालेल्या जमिनीचा हर्रास करण्याची वेळ आली त्यावेळी याबाबी उघडकीस आल्या. राजेंद्र तायडे यांच्या प्रभागातील एक भूखंड गेल्या चार वर्षांपासून अधिकार्‍यांना गवसलेलाच नाही. अश्या तक्रारी नगरसेवकांनी करताच प्रदीप बाजड यांनी सुनील काळे व अर्चना इंगोले ने या विषयाचा कसा पाठलाग केला याचा सखोल अभ्यासच सभेपुढे मांडला. त्यांनी यावेळी सांगितले की स्वत: आयुक्तांनी नवसारी भागातील लेआऊटची पाहणी केली असता येथील नाल्यांना धक्का देताच त्या कोलमडल्या होत्या. ही स्थिती फक्त एका नवसारी प्रभागात नाही तर संपुर्ण शहरात आहे. लेआऊट मंजूर करताना भूखंड मालकाच्या मनाप्रमाणे काम करीत त्यांना भूखंड विकासाची संधी दिली जाते. ज्यामध्ये निकृष्ठ काम झाल्यावर नागरिकांची ओरड मात्र नगरसेवकांकडेच असते. प्रशासन ‘एसी’ची हवा खात आनंदात असतात. अधिकार्‍यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देत आमसभेने कामात बेजाबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई, नवीन ले आऊट मंजुर करताना १0 टक्के जमिनी महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)