शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

- आता कोरोनामुळे डोळाही निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST

लोकमत विशेष गणेश देशमुख अमरावती - ‘एनिथिंग कॅन हॅपन इन कोराना एक्सेप्ट प्रेग्नन्सी ॲण्ड फ्रॅक्चर!’ कोराेनावर उपचार करणारी येथील ...

लोकमत विशेष

गणेश देशमुख

अमरावती - ‘एनिथिंग कॅन हॅपन इन कोराना एक्सेप्ट प्रेग्नन्सी ॲण्ड फ्रॅक्चर!’ कोराेनावर उपचार करणारी येथील डाॅक्टरमंडळी आपसांत बोलताना विनोदाने हे वाक्य उच्चारतात. अमरावतीत ते तंतोतंत खरे ठरते आहे. काेरोनामुळे आता एक डोळा कायमचा निकामी होत असल्याची धडकी भरविणारी अनेक प्रकरणे अमरावतीत समोर येत आहेत.

कोराेनाचा नवाच स्ट्रेन येथे वेगाने पसरल्यानंतर जगभरातील विषाणूशास्त्रज्ञांच्या नजरा अमरावतीवर पाच-सहा महिन्यांपासून खिळल्या असताना आता येथील डाॅक्टर्स कोरोनानंतर डोळा गमविण्याचा धोका उद्भवलेल्या रुग्णांसाठी झटत आहेत.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बुरशीपासून होणारा दुर्मीळ पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्याला म्युकरमायकाॅसिस म्हणतात. काेरोना होऊन गेलेल्यांना हा आजार होतो. कोराेनाकाळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे त्याचे मुख्य कारण. हे संक्रमण सायनसमधून सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. त्यातूनच डोळा निकामी होतो. मेंदूच्या संक्रमणातून पॅरॅलिसिस आणि मृत्यूही ओढवतो.

सर्जरीसाठी तज्ज्ञांच्या चमूची गरज

सर्जरीसाठी ईएनटी, डोळे आणि दातांचे शल्यचिकित्सक तसेच मेंदूविकारतज्ज्ञांच्या चमूची गरज पडते. आयसीयू सेटअपमध्ये सर्जरी करावी लागते. यशस्वी सर्जरीनंतरही ३०-४० टक्के रुग्ण प्रतिसाद देत नाहीत.

अमरावतीत ३०० रुग्ण

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अमरावतीत २० नेत्रतज्ज्ञ आहेत. आठवड्यात प्रत्येकाकडे १०-१२ रुग्ण येत आहेत. २२ ईएनटी सर्जन आहेत. १५ खासगी प्रॅक्टिस करतात. आठवड्याला प्रत्येकाकडे ५-६ रुग्ण येत आहेत. या अंदाजानुसार सरासरी सुमारे ३०० रुग्ण अमरावतीत दुसऱ्या लाटेत आढळून आल्याचा अंदाज बांधता येतो.

लक्षणे काय?

वरच्या पापणीला सूज येणे, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंद होणे, वस्तू दोन दिसणे, नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज ही या आजाराची दृष्य लक्षणे आहेत.

...तर संक्रमण नियंत्रण

संक्रमण सुरुवातीलाच थांबविले जाऊ शकते. परंतु, आरंभकाळातील लक्षणे नेहमी जाणविणारी डोकेदुखीसारखी सामान्य लक्षणे असल्याने ती रुग्णांच्या लक्षात येत नाहीत. तपासणीला आलेल्यांबाबत डाॅक्टरांना शंका आल्यास एन्डोस्कापी, सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांतून संक्रमण शोधता येऊ शकते; तथापि ती पद्धती खर्चिक असल्याने प्रत्यक्षात सरसकट उपयोगात आणता येत नाही, अशी अडचण डाॅक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.

----------

यांना धोका अधिक

रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असणाऱ्यांना, एचआयव्ही, कर्करोग, अनियंत्रित मधुमेह आहे अशांना धोका अधिक आहे. कोरोनाकाळात ॲन्टिव्हायरल आणि स्टेराॅईडमुळेही रोगप्रतिकार शक्ती घटते. त्यामुळेदेखील कोराेनानंतर हे संक्रमण होते.

कोट

२५ वर्षांत मी एकही रुग्ण बघितला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०-१२ रुग्ण मी तपासलेदेखील. डोळ्यांपर्यंत हे संक्रमण पोहोचते त्यावेळी डोळा वाचविणे अशक्य असते. दोन्ही डोळे गेलेले रुग्णही मी बघितले.

- डाॅ मनीष तोटे, नेत्रशल्यचिकित्सक, अमरावती.

-----------

कोट

संक्रमण वाढलेल्या अवस्थेत बुलडाण्याहून आमच्याकडे दाखल झालेल्या एका कोविड रुग्णाचा डोळा निकामी झाला. या आजारालाला ब्लॅक फंगल डिसिजही म्हणतात. यात मृत्युदर ६० टक्क्यांपर्यंत आहे.

- डाॅ. रोहिणी यादगिरे, आयसीयू तज्ज्ञ, अमरावती.

--------

कोट

दुसऱ्या लाटेत म्युकरमायकाॅसिसचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून ५-६ रुग्ण मी तपासतो. अनेकांना सर्जरीची गरज पडली. पूर्वी हे रुग्ण क्वचितच दिसायचे. आता विदर्भभरात हे रुग्ण आहेत.

- डाॅ. बबन बेलसरे, ईएनटी सर्जन, अमरावती

----------

कोट

एक्सपर्ट टीमने अलीकडे म्युकरमायकाॅसिसच्या आठ सर्जरीज् सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये केल्या. खासगी डाॅक्टरांच्या मिळून ६०-७० सर्जरीज झाल्या आहेत. हा आजार सर्वत्र आढळतो आहे.

- डाॅ. श्रीकांत महल्ले, ईएनटी सर्जन, सिव्हिल हाॅस्पिटल, अमरावती

--------