शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’

By admin | Updated: May 2, 2015 00:33 IST

खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, ....

पुस्तकावर शिक्के : पालकमंत्र्यांची खरीप आढावा बैठकीनंतर पत्रपरिषदअमरावती: खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याच्या तपासणीसाठी आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’ केली जाईल. आॅनलाईन खरेदीची सत्यता, पावती पुस्तकावर शिक्के मारण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान काही उणीवा आढळल्यास ते कृषी केंद्र कायमचे बंद करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली. ना. पोटे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आढावा बैठकीत भर देण्यात आला आहे. त्यांना वेळीच बियाणे, खत उपलब्ध करुन देण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी हीदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खतांचा पुरवठा केला जाईल. जिल्ह्यासाठी १६ मॅट्रिक टन युरियाची मागणी केली जात असून ती नक्कीच पूर्ण होईल, अशी श्वावती पोटे यांनी दिली. मातीचा पोत तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.खरीप हंगामात कृषी केंद्रावर काही भानगडी अथवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास कृषी अधिकाऱ्यांची खैर राहणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. कृषी केंद्राच्या तपासणीकरीता तालुकानिहाय तपासणी पथक असून हे पथक अधिक गतीमान कसे होईल, यावर सर्वाधिक भर देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.बनावट बियाण्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा रोखण्यासाठी पावती पुस्तक लक्ष्य करण्यात आले असून या पुस्तकावर कृषी विभागाचा शिक्का असल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही, असे ते म्हणाले. पावतीशिवाय बियाण्यांची खरेदी करु नयेकृषी केंद्रातून बियाणे अथवा खत खरेदी करताना पावती घेतल्याशिवाय ते खरेदी करुन नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समस्त शेतकऱ्यांना केले आहे. एकाद्या वेळी बियाण्यांची उगवण झाली नाही तर त्या कृषी केंद्रावर शासन स्तरावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कृषी केंद्रातून साहित्याची खरेदी करताना बीलाची पावती घेवूनच ते दुकान सोडावे, असे ते कडकडीचे आवाहन त्यांनी केले.बियाणे खरेदीची सक्ती केल्यास परवाने रद्द करुदरवर्षी कृषी केंद्राचे संचालक अमूक बियाणे खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करतात. लिंकिंग पद्धतीने ते खरेदी करावेच लागते, अशा भूलथापा देऊन निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र, यंदा असा प्रकार निदर्शनास आल्यास त्या कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरुपी बंद करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सोयाबीन बियाणे चांगल्या दर्जाचे असल्याची माहिती त्यांनी दिली.