शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनिस्ट्री’ नव्हे, शेतकरी महत्त्वाचा

By admin | Updated: February 16, 2015 00:15 IST

नांदगावपेठ येथील औद्योगिक पंचतारांकित वसाहत परिसरात साकारण्यात आलेल्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय देताना लोकांच्या बाजुने उभा राहिल.

अमरावती : नांदगावपेठ येथील औद्योगिक पंचतारांकित वसाहत परिसरात साकारण्यात आलेल्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, प्रकल्पग्रस्तांना न्याय देताना लोकांच्या बाजुने उभा राहिल. मला ‘मिनिस्टरी’ नव्हे तर शेतकरी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी आयोजित आढावा बैठकीत ‘सोफिया’च्या अधिकाऱ्यांना खडसावले.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, भाजपच्या नेत्या निवेदिता चौधरी, दिलीप निंभोरकर, सोफियाचे शरद किनकर, अनिल भटकर, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह एमआयडीसी, सोफियाचे अधिकारी उपस्थित होते. सोफियातील नोकरी संदर्भातील गाऱ्हाणी ऐकली. २८५ आहेत प्रकल्पग्रस्तनांदगाव पेठ, एमआयडीसीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात असे २८५ प्रकल्पग्रस्त असल्याची नोंद आहे. यात आतापर्यंत ११३ लोकांना नोकरी मिळाली आहे. ४२ जण त्रुटीत आहेत. ४० लोकांना आदेश दिले असून त्यांना १५ मार्चपर्यंत नियमानुसार सामावून घेतले जाणार. ९२ जणांनी अर्ज केले नाही. २० जणांना १० मार्चपर्यंत नोकरीवर रुजू होण्याचे आदेश दिले जातील, असे सोफियाचे वरिष्ठ अधिकारी शरद किनकर यांनी सांगितले.